Dinvishesh 9 October Sarkarnama
विशेष

9th October in History - बसपाच्या संस्थापकांचे निधन आणि उत्तर कोरियाची अणूचाचणी

Rashmi Mane

उत्तर प्रदेशचे राजकारण एकेकाळी गाजवले ते कांशीराम, मायावती यांनी...१९९५ साली झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका बहुजन समाज पक्षाने जिंकल्या आणि देशाच्या राजकीय पटलावर कांशीराम यांची हवा झाली. वास्तविक कांशीराम यांचा जन्म पंजाबचा. पण नंतरच्या काळात प्रामुख्याने उत्तर प्रदेश हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र राहीले.

कांशीराम यांनी बीएसस्सीची पदवी मिळवली होती. पुणे पुण्यातल्या उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा घटक असलेल्या संस्थेत रुजू झाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाची सार्वजनिक सुटी रद्द होऊ नये म्हणून १९६५ मध्ये शासन सेवेतल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. कांशीराम यांच्या जीवनातला चळवळीचा टप्पा इथूनच सुरु झाला.

१९७८ साली कांशीराम यांनी बामसेफ या बिगरराजकीय, बिगरधर्मिय स्वरुपाच्या संघाची स्थापना केली. १९८१ पासून त्यांनी दलितांच्या एकीकरणासाठीचे प्रयत्न सुरु केले. त्यातूनच १९८४ साली बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली. या पक्षाने उत्तर प्रदेशात चांगले यश मिळवले.

१९९१ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांशीराम होशियारपूरमधून निवडणून आले. १९९६ साली त्यांनी पुन्हा खासदारकीची निवडणूक जिंकली. मायावती यांच्या सारखा नेता घडविणाऱ्या या वादळी व्यक्तिमत्त्वाचे आजच्याच तारखेला म्हणजे ९ ऑक्टोबर २००६ साली निधन झाले....

Dinvishesh 9 October

उत्तर कोरियाचे आव्हान

आजच्याच दिवशी म्हणजे ९ ऑक्टोबर,२००६ रोजी उत्तर कोरियाने सर्व बाजूनी आलेला दबाव झुगारून पहिल्या अणुबाँबची चाचणी केली. कोरियाच्या या आव्हानामुळे अमेरिकेसह साऱ्या जगाला धक्का बसला.

उत्तर कोरियाच्या या धाडसामागे चीन आणि पाकिस्तान होते हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते. उत्तर कोरियाने चीनकडून गुप्तपणे अणुबाँबचे तंत्रज्ञान मिळवले होते. पाकिस्ताननेही क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळविण्याच्या बदल्यात १९९७ मध्ये उत्तर कोरियाला अणुबाँबचे तंत्रज्ञान आणि किंमती माहिती पुरवली होती. या चाचणीपूर्वीच अमेरिकेने उत्तर कोरियावर आर्थिक निर्बंध लादले होते.

दिनविशेष - 9 ऑक्‍टोबर

  • जागतिक टपाल कार्यालयदिन

  • 1876 - बौद्ध धर्माचे जगप्रसिद्ध अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांचा जन्म.

  • 1892 - "लोकहितवादी' नावाने समाजसुधारणाविषयी लेखन करणारे रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. 1848 ते 50 याकाळात "प्रभाकर' साप्ताहिकातून त्यांनी "शतपत्रा'चे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणाऱ्या रुढींवर त्यानी प्रहार केला. त्यांनी 43 मराठी ग्रंथ लिहिले. त्यांचा "लक्ष्मीज्ञान' (पोलिटिकल इकॉनॉमी) हा अर्थशास्त्रावरील पहिला मराठी ग्रंथ.

  • 1946 - भारतीय परराष्ट्र सेवेस सुरुवात

  • 1962 - युगांडाला स्वतंत्र राष्ट्रकूल क्षेत्र म्हणून मान्यता

  • 1998 - आपल्या आकाशगंगेबाहेरील आकाशगंगेचे सर्वात मोठे किरणोत्सर्गी केंद्र (क्वास्सार) शोधण्यात नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ऍस्ट्रोफिजिक्‍सच्या (एन.सी.आर.ए.) शास्त्रज्ञांना यश.

  • १९७० - भारतीय बनावटीच पहिले मिग लढाऊ विमान भारतीय हवाई दलाकडे सुपुर्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT