Dilip Walse Patil
Dilip Walse Patil sarkarnama
विशेष

भाजप नेत्यांवरही कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही; पण... : वळसे पाटलांची भूमिका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp) भाजप (BJP) नेत्यांबाबत सॉफ्ट भूमिका असण्याचे कारणच नाही. मला कळतंच नाही की, स्वॉफ्ट भूमिका आणि हार्ड भूमिका काय असते ती. समोर जे कागद येतील, वस्तुस्थिती येईल, त्याच्या आधारेच निर्णय घेतले जातात. शेवटी उद्या काहीही कारवाई केली, तर ती कारवाई न्यायालयामध्ये टिकली पाहिजे. चूक असेल तर ती चूक म्हणणे आणि संबंधितांवर कारवाई करणे, याच्यासाठी आम्ही मागेपुढे पाहण्याचे कोणतेही कारण नाही, अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राज्यात सुरू असलेल्या चर्चेवर मांडली. (Action taken against BJP leaders should stand in court : Walse Patil)

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर राज्यात एक चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री ठाकरे गृहमंत्र्यांवर नाराज, राष्ट्रवादी भाजपबाबत सॉफ्ट भूमिका घेते आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळा रंगली होती. त्या भेटीबाबत खुद्द वळसे पाटील यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

गृह विभागाकडून भाजपला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. ते होत नाही, हे खरं आहे का. या प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले की, अशी कोणतीही परिस्थिती नाही. शेवटी जे कायदे आणि नियम आहेत, त्याच्या आधारेच आपल्याला सरकारचा आणि गृहविभागाचा कारभार कारावा लागतो. प्रत्येक प्रकरणांत गृहमंत्री स्वतः आदेश देत नाहीत. डीजी, सीपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर निर्णय होत असतात. ते निर्णय करताना विलंब झाला तर त्याचे सुपरव्हिजन करण्याचे आणि त्याला गती देण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची असते. ते काम आम्ही करत असतो.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान दिलेल्या ‘पेन ड्राईव्ह’चे प्रकरण हे सीआयडीकडे चौकशीसाठी सोपविण्यात आलेले आहे. चौकशी करून सीआयडी त्याचा अहवाल दईल, त्यानुसार कारवाई होईल. त्यासाठी त्यांना वेळेचे कोणतेही बंधन दिलेले नाही. कारण, तपासासाठी पोलिसांनाही पुरेसा वेळ देण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांन स्पष्ट केले.

मुख्यमंत्री नाराज असण्याचा प्रश्नच नाही. सर्व निर्णय एकमेकांना विश्वासात घेऊन घेतले जातात. गृहमंत्रीपद शिवसेनेला हवे आहे, असे मला तरी वाटत नाही. पण, त्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारा,अशी गुगलीही वळसे पाटील यांनी टाकली. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतरही भाजप नेत्यांवरील कारवाईला वेग येत नाही, हे शिवसेनेचे दुखणे आहे का आणि गृहविभाग अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर वळसे पाटील म्हणाले की, भाजप नेत्यांवर कारवाई होत नाही, म्हणून शिवसेना नाराज आहे, असं मला तरी वाटत नाही. संजय राऊत यांची आज भेट होणार आहे. त्याबाबत त्यांना भेटल्यानंतर विचारेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT