काॅंग्रेस आमदाराची खदखद बाहेर : बाळासाहेब थोरातांविरुद्ध जाहीर नाराजी

काॅंग्रेसमधील 25 आमदारांच्या गटाने राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsarkarnama
Published on
Updated on

जालना : काॅंग्रेसमधील आमदार नाराज का आहेत, याचे उत्तर जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी दिले आहे. महसूलमंत्री आणि काॅंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे नाव घेऊन गोरंट्याल यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये काॅंंग्रेसला नगण्य स्थान असल्याचे सांगत आम्ही थोरातांकडे तक्रार केली की ते आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेण्याचा सल्ला देतात, असा अनुभव गोरंट्याल यांनी सांगितला.

Balasaheb Thorat
संग्राम थोपटे यांची प्रतिक्षा संपेना.. अडीच वर्षे पदाची वाट पाहण्यातच!

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोरंट्याल यांनी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचे नाव घेऊन तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. या भेटीत 20 ते 25 आमदार सोबत असल्याचे थोपटे यांनी पत्रात लिहिले आहे. येत्या 3 ते 4 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील आमदार एका प्रशिक्षण शिबिरासाठी दिल्लीत असल्याने त्यानिमित्त या भेटीचा योग जुळवून आणण्याचा प्रयत्न आहे. या पत्रावर ज्या आमदारांनी सह्या केलेल्या आहेत त्यात गोरंट्याल यांचाही समावेश आहे.

गोरंट्याल यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीच समान वाटप व्हायला हवे. प्रत्यक्षात तसे होत नाही. आमचे ज्येष्ठ नेते यात लक्ष घालत नाहीत. हे नेते किती वर्षे मंत्री आहेत? थोरात यांना विधानसभा अध्यक्षपदावर बसविण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी तो पाळला नाही, असाही आरोप गोरंट्याल यांनी केला. या साऱ्या बाबी आम्ही कानावर घालणार आहोत.

Balasaheb Thorat
काँग्रेसच्या नाराज आमदारांचं नेतृत्व संग्राम थोपटेंकडे

थोपटे यांनी नाराज आमदारांचे नेतृत्व करत ही भेटीची वेळ मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आपल्या नेत्यांना वर्ष झाले तरी घेता आली नाही यावर काॅंग्रेसची मंडळी नाराज आहेत. तसेच राष्ट्रवादीची दादागिरी सहन करावी लागते, असाही तक्रारीचा सूर आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या पत्रावर सह्या केल्याने त्यांनीही प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पक्षाध्यक्षांच्या भेटीची वेळ आमदारांनी मागण्यात काय चूक आहे, असा सवाल करत काॅंग्रेसमध्ये नाराजी नसल्याचा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com