Jayant Patil, Nawab Malik
Jayant Patil, Nawab Malik  sarkarnama
विशेष

भाजपच्या ‘त्या’ नीतीमुळेच आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही : जयंत पाटील

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील कोणतेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. (Allegations against Nawab Malik not proved: Jayant Patil)

नवाब मलिकांवर ईडीने कारवाई केल्यानंतर ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी भाजपकडून आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, विविध माध्यमांतून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजप आणि त्यांच्या नेत्यांकडून होत आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून दररोजच तशी मागणी विरोधकांकडून होत आहे, त्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

केंद्रीय यंत्रणेचा वापर करून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. अशा कारवाईनंतर विरोधकांकडून (भाजप) मंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहेत. त्याबाबत जलसंपदा मंत्री पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशन सुरू झाल्यापासून करत आहेत. पण, मलिक यांच्यावरील कोणतेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.

कोणत्या मंत्र्याला तुरुंगात ठेऊन त्यांचे राजीनामे घ्यायचे, हे संयुक्तिक आहे, असे मला वाटत नाही. एखादा गुन्हा सिद्ध झाला तर मंत्र्यांचा राजीनामा घेणे समजू शकतो. मात्र, मलिकांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. अनिल देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा दिला होता. त्यानंतर देशमुखांवर अनेक गुन्हे लावण्यात आले. आतापर्यंत तब्बल ९५ वेळा त्यांच्या विविध निवासाच्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक होत आहेत, ही धारणा आम्हा सर्वांची झालेली आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली असती तर ते याबाबत स्पष्टीकरण देऊ शकले असते. मात्र, त्यांना संधी न देता अटक करण्यात आली आहे. त्यांना स्पष्टीकरण देण्याची संधी द्यायला हवी होती. त्यामुळेच नवाब मलिक यांचा राजीनामे घेणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT