Prasad Lad, Neelam Gorhe, Ambadas Danve  sarkarnama
विशेष

Ambadas Danve News: अंबादास दानवेंच्या नावावर 'नकोसा' रेकॉर्ड; विधिमंडळाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले

Sachin Waghmare

Mumbai News : विधानपरिषदेत सोमवारी कामकाज सुरु असताना मोठा गदारोळ झाला होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी त्यांच्याकडे हात करुन बोलणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवेंना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दानवे कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्यानंतर मंगळवारी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा विधिमंडळातील अशोभनीय प्रकार असल्याचे सांगत अंबादास दानवेंचे पाच दिवसासाठी निलंबनाची घोषणा केली. या प्रस्तावावर विधान परिषदेत मतदान घेण्यात आले. हा ठराव बहुमताने संमत झाला. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे अंबादास दानवे यांच्या निलंबनाची घोषणा केली.

आतापर्यंतचा विधिमंडळाच्या इतिहास पाहिला तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला निलंबित करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलाय. अशास्वरुपाचा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याच्या वृत्ताला अनेक आमदारांनी दुजोरा दिला आहे. (Ambadas Danve News)

या प्रकारानंतर विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले होते. मात्र, विरोधी पक्षनेत्याला निंलबित करण्याची विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याची आठवण या प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील विधिमंडळाच्या आवारातच पत्रकारांशी संवाद साधताना करून दिली.

विधान परिषदेच्या सभागृहातील आजपर्यंतचा इतिहास पहिला तर आमदाराला निलंबित केले जाते. आमदारांना ही सहा महिन्यांसाठी म्हणजे एकाद्या अधिवेशनापर्यंत निलंबित करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, विरोधी पक्षनेत्यांवर आजपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही.

उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी विधानपरिषदेतील गटनेत्याच्या बैठकीत यावर चर्चा केली. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती, असेही त्या म्हणाले. मात्र दानवेंचे वर्तन हे सभागृहाला शोभणारे नसल्याने आपण दुःखी अंतःकरणाने हा निर्णय घेतला आहे, असे सांगत यावरील चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

विधिमंडळाकडून विरोधी पक्षनेत्यावर अशा प्रकारची कारवाई करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळींकडून सुरु असल्याने नाराजी व्यक्त करीत या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. मात्र, या निलंबनाच्या प्रकारानंतर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT