Amol Mitkari Latest News
Amol Mitkari Latest News  Sarkarnama
विशेष

जिजाऊंची बदनामी करणारा तो मजकूर मिटकरींनी भर सभेतच वाचून दाखवला...

सरकारनामा ब्यूरो

सांगली : राष्ट्रवादी (NCP) परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मंत्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची आक्रमक भाषणे झाली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उत्तर देण्याच्या निमित्ताने मिटकरींनी बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांच्यावर हल्लाबोल केला. (Amol Mitkari Latest News)

मिटकरींनी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातील काही उतारे वाचवून दाखवत राज ठाकरे याविषयी का बोलत नाही, असा सवाल उपस्थित केला. माॅं जिजाऊ यांची बदनामी करणारा मजकूर पुरंदरे यांनी कशा पद्धतीने लिहिला आहे, हे त्यांना भर सभेत वाचून दाखविले. जेम्स लेन याला पुरंदरेंनी कसे सहकार्य केले, याचीही माहिती मिटकरी यांनी दिली. अशा प्रकारचा मजकूर शक्यतो कोणी जाहीरपणे सांगत नाही. पण मिटकरी यांनी आता हे सांगण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट करत तो मजकूर आणि त्यामागे पुरंदरेंना काय सुचवायचे आहे, हे जाहीरपणे सांगितले. तसेच हनुमान चालीसा स्पिकरवर लावणाऱ्यांना स्वतःला तरी हनुमान चालीसा येते का? असा प्रश्न उपस्थित करुन मिटकरी यांनी हनुमान चालीसा आणि मारुती स्त्रोत्र म्हणून दाखविले. त्यांच्या या पाठांतराला जयंत पाटील यांनीही दाद दिली.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार भाषण केले. ते म्हणाले की, "आम्ही लहानपणी रामदास पाध्ये यांचा कार्यक्रम पाहायचो. त्यांच्या हातात अर्धवट राव नावाचा एक पुतळा असायचा. जे रामदास पाध्येला बोलायचे नाही, ते पाध्ये अर्धवट रावाच्या तोंडून बोलायचे. आज भाजप अर्धवट रावाच्या तोंडून बोलत आहे. या अर्धवट रावांनी मागच्या निवडणुकीत भाजपची सीडी लावली. त्यानंतर त्यांच्यामागे ईडी लागली आणि आता ते म्हणतायत कुठेय ती सीडी?" अशी घणाघाती टीका . मुंडे यांनी केली.

तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. जितेंद्र आव्हाड यांनी देखील विरोधकांवर जोरदार टीका केली. "आज इतिहास आणि धर्मांधतेचे प्रश्न उभे केले जात आहेत. त्यालाही आम्ही सडेतोड उत्तर देऊच. पण सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यावर जनतेचे लक्ष वळविणे गरजेचे आहे. आज आपल्या शेजारी असलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्या देशाचा देखील पाकिस्तान करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT