मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ह्या एक बँकर असून अक्सिस (Axis Bank) बँकेच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. याशिवाय त्या गायिका सुद्धा आहेत. त्यांनी 'सरकारनामा' ला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी पती देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी गायलेले कुठले गाणे आवडते याचा उलगडा केला आहे.
मुलाखती दरम्यान अमृता फडणवीस यांनी सांगितले की, गायनाची आवड ही मला लहानपणापासूनच होती. माझ्या आजीने माझ्या वडिलांना गायन शिकवले आणि त्यांनी मला. आई-वडील हे दोघेही डॉक्टर होते. मात्र, ते सारखे व्यस्त असायचे त्यांच्याकडे बघून मला डॉक्टर व्हावेसे वाटले नाही. मला इतर गोष्टीत आवड होती. यामुळे मी कॅामर्स निवडले आणि कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे तेव्हाच ठरवले होते. बँकेत नोकरी करत असल्याने मला गायनासाठी वेळ मिळाला असे त्यांनी सांगितले.
देवेंद्रजींना तुमचे कुठले गाणे आवडते? या प्रश्नाला उत्तर देतांना असृता फडणवीस म्हणाल्या, मी गायलेले सर्वच गाणे देवेंद्रजींना आवडतात. यामध्ये आता गायलेली गणेश वंदना, अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेले `फिरसे` हे गाणे सुद्धा त्यांना आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गायनासाठी वेळ मिळतो का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, नियोजन करून गायनासाठी वेळ काढला जातो. स्त्रीया ह्या फार मल्टिटास्किंग असते. माझ्याकडे काम करण्यासाठी लोक आहेत. मात्र, सामान्य महिला ऑफिसचे काम करून इतर सर्व कामे करतात. आवड असली की सर्व शक्य होत असल्याचे फडणवीस म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.