Anil Parab-Uddhav Thackeray-Ambadas Danve Sarkarnama
विशेष

Video Anil Parab : अनिल परब लेट आले, पण थेट ठाकरे, दानवेंच्या शेजारी बसले!

Vijaykumar Dudhale

Mumbai, 27 June : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज (ता. 27 जून) विधीमंडळात हजेरी लावली. विधीमंडळात लिफ्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट...चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना भरवलेला पेढा या गोष्टी चर्चेत असतानाच शिवसेनेत अनिल परब यांचे वजन कायम असल्याचे दिसून आले. कारण पत्रकार परिषेदला उशिरा येऊन ते ठाकरे, दानवेंच्या शेजारी बसले होते.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आजपासून मुंबईत सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधीमंडळात हजेरी लावली. योगायोग म्हणजे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची लिफ्टमध्ये भेट झाली. विशेष म्हणजे मागील अधिवेशनात फडणवीस आणि ठाकरेंची झालेली भेटही चर्चेचा विषय ठरली होती.

दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब (Anil Parab) यांना भरवलेला पेढा विशेष लक्षवेधी ठरला. तो किती फलदायी ठरेल, हे विधान परिषदेच्या निकालानंतर लक्षात येईल. पण चंद्रकांतदादांनी परबांना दिलेला पेढा विशेष चर्चेचा ठरत आहे.

या गाठीभेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरेंची पत्रकार परिषद एकच्या सुमारास सुरू झाली. त्या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर पत्रकार परिषदेला हजर होते. मात्र, आमदार अनिल परब कुठेही दिसत नव्हते.

माजी आमदार अनिल परब हे सुमारे 1 वाजून 12 मिनिटांनी शिवालयालयात ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला आले. आल्यानंतर ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बसले. त्यामुळे शिवसेनेत अनिल परब यांचे वजन कायम असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे परबांची आमदारकी संपल्यानंतर लगेच त्यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यासाठी बुधवारी (ता. 26 जून) मतदान झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून परब हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात आहेत. विशेषतः न्यायालयीन प्रक्रियेत अनिल परब यांची भूमिका महत्वाची ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेसंदर्भातील सुनावणीसाठी परब हे कागदपत्रे पोहोचवण्यापासून अनेक कामांत आघाडीवर होते. त्यामुळे परब हे ठाकरे परिवाराच्या एकदम निकटचे म्हणून ओळखले जातात. आजच्या पत्रकार परिषदेतील परब यांचे शिवसेनेतील वजन पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT