Sunil Tatkare On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा अन् सुनील तटकरेंची इच्छा!

Sunil Tatkare Reaction To Devendra Fadnavis Resignation : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिला आहे. देवेंद्र फडणवीस प्रभावी व्यक्तिमत्त्व असून, ते मंत्रिमंडळात हवे आहेत, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
Sunil Tatkare And Devendra Fadnavis
Sunil Tatkare And Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare And Devendra Fadnavis : महायुतीमधील भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. यावर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची पहिल्यादांचा प्रतिक्रिया समोर आली आहे.

'देवेंद्र फडणवीस प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी राजानीमा देऊ नये. विधानसभेच्या निवडणुकीच्या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असेल', असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आज नगर दौऱ्यावर होते. पक्ष संघटनेची बांधणी या दौऱ्यात करत आहेत. विधानसभेची तयारी सुरू असून, पक्ष संघटना प्रबळ करण्यासाठी हा दौरा असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी विधानसभेला समोरे जाताना महायुती किती प्रभावी असेल यावर भाष्य केले.

लोकसभेतील अपयशानंतर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवला होता. यावर भाजपसह महायुतीत तीव्र पडसाद उमटले. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा प्रतिक्रिया आली आहे.

Sunil Tatkare And Devendra Fadnavis
Congress On Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना 'मतदान जिहाद' विधान भोवणार; काँग्रेसच्या तक्रारीवर फौजदारी होणार?

सुनील तटकरे म्हणाले, "भाजपचा हा विषय अंतर्गतबाब आहे. महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून त्यावर मत मांडतो. तशी एक इच्छाच आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सरकारमध्ये असले पाहिजेत. त्यांना प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे. एकेकाळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद संभाळले आहे. पक्ष संघटनेचे काम ते मंत्रिपदावर राहून देखील करू शकतात".

विधानसभा निवडणुकीला महायुतीला प्रभावीपणे समोरे जाताना देवेंद्र फडणवीस आमच्याबरोबर राहिल्यास ते अधिक प्रभावी होईल. महायुतीच्या विजयाला हातभार लागेल, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.

Sunil Tatkare And Devendra Fadnavis
Mahayuti Dispute : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार महायुतीतून बाहेर पडणार; नागपूरच्या बड्या नेत्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत असलेल्या मंत्रिपदावर आम्ही समाधानी नव्हतो. राज्यमंत्री पद मिळत होते. केंद्रातील मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी हवा म्हणून आग्रही होतो. प्रफुल्ल पटेल तिथे असले पाहिजे. परंतु प्रफुल्ल पटेल पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिले होते. आमचा कॅबिनेट मंत्रिपदासाठीचा आग्रह होता. ते मिळत नसल्याने आणि मला अजितदादांसाठी पक्ष संघटनेत काम करायचे होते. त्यामुळे मी मंत्रिपदात खास रस दाखवला नाही. याबाबत पुढे बरच काही होणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com