Anna Hazare on Slams AAP : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. आम आदमी पार्टीच्या आणि केजरीवालांच्या पराभवावर बोलातना अण्णा म्हणाले, ''ते आले, त्यांनी पाहिलं, ऐकलं पण केलं नाह. म्हणून आज भोगाव लागलं. मी आधीच सांगितलं होतं, पक्ष अन् पार्ट्यातून सेवाभाव जोपर्यंत बाजूला जाईल, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही.
तसेच, अण्णा हजारे(Anna Hazare) ''पक्ष आणि पार्ट्याच्या आधीपर्यंत माझं केजरीवालांशी बोलणं होत होतं. त्यांनी परंतु पक्ष आणि पार्टी काढली तेव्हापासून मी बोलणं बंद केलं आहे. प्रत्येक पक्ष आणि पार्टीने बलिदानाची आठवण ठेवली पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 ते 1947 ही 90 वर्षे ज्या लोकांनी बलिदान दिलं. फाशीवर गेले, तुरुंगवास भोगला, भूमिगत राहिले. त्यांचे कायम स्मरण ठेवा. हे स्मरणात ठेवलं तर देश सेवाभावाने चालेल.'' असंही सांगितलं.
याशिवाय, अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांचा पराभव का झाला? या प्रश्नावर थेट उत्तर देताना अण्णा म्हणाले, ''दारू डोक्यात शिरली ना. दारूची दुकानं डोक्यात शिरली. पक्षाने दारूच्या दुकानांना परवाने देणे हे कितपत बरोबर आहे? हे असायला नको होतं.''
याचबरोबर, ''सत्ता येणं आणि जाणं हे कालचक्र फिरत असतं. फक्त सत्ता जाताना आणि येताना लोकांनी सावधान राहायला पाहिजे, आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजे. जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे. तुम्ही दारूचे दुकान काढायला लागला दारूचे परवाने काढायला लागला, तर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. दारू ही वाईट आहे कुणाला वाटत नाही. सगळ्यांना माहिती तरी तुम्ही दारूचे दुकान काढता. '' अशा शब्दांमध्ये अण्णांना आम आदमी पार्टीच्या(AAP) पराभवावर आणि एकूणच केजरीवालांवर निशाणा साधला आहे.
अण्णा हजारे यांनी दिल्लीत मतदानापूर्वी 'आप'ला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. अण्णांनी केंद्रात यूपीएची सत्ता असताना दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. याच आंदोलनातून केजरीवाल पुढे आले आणि नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत आपची स्थापना केली. अण्णांनी त्याला विरोध केला होता. तेव्हापासून ते केजरीवालांच्या भूमिकेला विरोध करत आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.