Milkipur Bypoll Result : मोठी बातमी : भाजपने लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला; अयोध्येत कमळ फुलणार...

Assembly election result Update Ayodhya Election BJP News : भाजपचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी तब्बल 14 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.
Milkipur Election Result
Milkipur Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Election Update : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचा दारूण पराभव झाला. त्यातही अयोध्येतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. आजच्या निकालामध्ये भाजप या मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा भाजप काढणार, असेच सध्याचे चित्र आहे. सकाळी साडे दहा वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार, पाच फेऱ्यांचे कल हाती आले असून भाजपचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी तब्बल 14 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 27 हजार 115 मते पाचव्या फेरीअखेर मिळाली आहेत.

Milkipur Election Result
Delhi Assembly Election Live 2025 Results Updates : राजधानी दिल्लीत भाजपचा विजयी जल्लोष, PM मोदींची ग्रँड एन्ट्री

समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद पिछाडीवर पडले आहे. त्यांना आतापर्यंत केवळ 12 हजार 850 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे ते फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र आहेत. मिल्कीपूर मतदारसंघ त्यांच्याच मतदारसंघातील आहे. त्यामुळे अजित प्रसाद यांची पिछाडी अवधेश प्रसाद यांच्यासह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासाठीही धक्कादायक मानली जात आहे.

लोकसभा निवडणुकीआधी मिल्कीपूरचे प्रतिनिधित्व अवधेश प्रसाद करत होते. त्यांनी लोकसभेसाठी राजीनामा दिल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यांनी आपल्याच मुलाला उमेदवारी देत विजयासाठी कंबर कसली होती. अखिलेश यादव यांनी जोरदार प्रचारही केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचारात कोणतीही कसर ठेवली नाही. अनेक बड्या नेत्यांना त्यांनी कामाला लावले होते.

Milkipur Election Result
Delhi Elections : 'एक्झिट पोल'चेही अंदाज चुकणार,'या' 20 जागांनी वाढवली भाजप, आपची धडधड!

समाजवादी पक्षाने जंग जंग पछाडूनही त्यांना या निवडणुकीत विजय मिळताना दिसत नाही. तर भाजपने केलेल्या प्लॅनिंग यशस्वी होताना दिसत आहे. पासवान हे मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत समाजवादी पक्षाला धूळ चारण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे या निवडणुकीतील विजय भाजपच्या जखमेवर फुंकर मारून काहीसा दिलासा देईल, असे दिसते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com