Bacchu Kadu Sarkarnama
विशेष

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषदेसाठी कोणाला मतदान करणार? बच्चू कडूंनी जाहीरपणे सांगितले..

Bachchu Kadu: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीने नऊ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात भाजपचे सर्वाधिक पाच, तर शिवसेना शिंदे गटाकडून दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवार आहोत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 12 July : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत मोठी चुरस दिसून येत असून घोडेबाजाराला ऊत आल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मतदानाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आम्ही गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आहोत, त्यामुळे आमचा पक्ष शिंदे यांच्याच उमेदवाराला प्राधान्य क्रमाने मतदान करेल. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मतदारसंघासाठी भरपूर निधी दिली आहे, त्यामुळे मी स्वतः आणि आमच्या पक्षाचे दुसरे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) दोघेही शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करणार आहोत, असे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने घोडेबाजार रंगला आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे एकही मत फुटणार नाही. बाकीच्या लोकांची मला सांगता येणार नाही, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

मागील निवडणुकीत फोडाफोडी झाली होती. मात्र, मी सध्या त्या प्रक्रियेत नाही. त्यामुळे मला त्याबाबत काही माहिती नाही. पण मी आणि माझे आमदार राजकुमार पटेल या दोन नावाची ग्यारंटी घेऊ शकतो. प्रहारची दोन्ही मते एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला जाणार. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन मतदान करणार.

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार विदर्भातील आहेत, त्यामुळे आम्ही भावना गवळी आणि कृपाल तुमाने या दोन्ही उमेदवारांना मतदान करणार आहोत, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीने नऊ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात भाजपचे सर्वाधिक पाच, तर शिवसेना शिंदे गटाकडून दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन असे महायुतीचे एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहोत. महाविकास आघाडीचेही तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT