BJP leader Ganesh Naik and MLA Sanjay Kelkar openly target Deputy CM Eknath Shinde in Thane district politics. Sarkarnama
विशेष

BJP Vs Shivsena : भाजपचे दोन शिलेदार एकनाथ शिंदेंना सुट्टीच देईनात... नाईकांपाठोपाठ आमदार केळकरांनीही अंगावर घेतलं!

BJP Vs Shivsena : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सत्तेत असले तरी ठाण्यात भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.

Hrishikesh Nalagune

BJP Vs Shivsena : राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेत असले तरी ठाणे जिल्ह्यात भाजप हाच शिवसेनेचा विरोधी पक्ष बनला आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. या दोन्ही पक्षांचे ठाण्यात एक टक्काही पटत नाही. मंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याची, टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता भाजप आमदार संजय केळकर यांनीही शिंदेंवर जहरी टीका केली आहे.

ठाण्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा राम गणेश गडकरी रंगायतनच्या नूतनीकरण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात दाखवलेल्या चित्रफितीवरून भाजप आमदार संजय केळकर यांनी नाव न घेता शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसंच प्रशासनावरही टीका केली. ‘आमच्या येथे एक रिमोट कंट्रोल आहे. ते जेवढे सांगतील त्याप्रमाणे आयोजन होते. त्यामुळे त्या चित्रफितीतील अभिनय मला तोंडाने सांगण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

40 वर्षांत इतके आमदार झाले; मात्र या शहराचे सांस्कृतिक पण टिकवणाराही एक आमदार असा निघाला. त्याने रंगभूमीवर हौशी नाही, तर व्यावसायिक रंगभूमीवर नावलौकिक मिळवला आहे. सध्या पालिकेवर प्रशासकीय राजवट असली तरी प्रशासन कोणाच्या ना कोणाच्या अधीन गेलेले दिसते, अशी टोलाही त्यांनी लगावला. मला अनेक लोकांचे फोन आले. या नाट्य क्षेत्रातल्या अनेक लोकांनी विचारले. हे काही आजचे नाही, नेहमीचेच आहे. ठाणेकरांना बरोबर माहिती आहे. ते योग्य वेळेला उत्तर देतील, अशी टीका आमदार केळकर यांनी केली.

राष्ट्रवादीसह-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीही टीका :

राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या उभारणीत योगदान असलेल्यांच्या नावांची कोनशीला आता कोपऱ्यात लावण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोहिदास मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही बाळासाहेब असो किंवा धर्मवीर आनंद दिघे असो, त्यांची कोनशीला योग्य पद्धतीने लावणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT