C. T. Ravi-H.k.Patil Sarkarnama
विशेष

Maharashtra Politic's : काँग्रेस-भाजपला मिळणार नवे प्रभारी; रवींना वगळले, तर पाटलांचा भार कमी करण्याचा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : भारतीय जनता पक्षाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी आज (ता. २९ जुलै) जाहीर केली. त्यात महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनाही पदावरून वगळण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्र प्रभारीपदी नव्या नेत्याची निवड होणार हे आता निश्चित असून ती जबाबदारी कोणाकडे जाते, याची उत्सुकता आहे. (C. T. Ravi was removed from the post of Maharashtra in-charge by the BJP)

विशेष म्हणजे काँग्रेसनेही (Congress) आपले महाराष्ट्राचे (Maharashtra) प्रभारी बदलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. योगायोग म्हणजे काँग्रेस आणि भाजपचे (BJP) महाराष्ट्र प्रभारी हे कर्नाटकातीलच (Karnataka) होते. यातील काँग्रसेच प्रभारी एच. के. पाटील हे विधानसभेची निवडणूक जिंकून मंत्री झाले आहेत, त्यांचा भार कमी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. दुसरीकडे सी. टी. रवी (C.T. Ravi) यांचा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ भाजपनेही आपला महाराष्ट्र प्रभारी बदलण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे.

सी. टी. रवी यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे प्रभारीपद होते. त्यांच्या कार्यकाळात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) साथीने भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर आले होते. रवी हे कर्नाटकातील भाजपचे कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. ते चिकमंगळूर मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले होते.

मागील निवडणुकीत भाजपतून काँग्रेसमध्ये गेलेल्या एच. डी. तमय्या यांच्याकडून पराभूत झाले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या फेरबदलात त्यांच्याकडून महाराष्ट्राचे प्रभारीपद काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात नवा प्रभारी लवकरच नेमावा लागणार आहे. कारण, तोंडावर लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणूक काळात महत्वपूर्ण ठरणाऱ्या या पदावर भाजप कोणाला संधी देतो, हे पहावे लागणार आहे.

दरम्यान, काँग्रेसने आपले महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पाटील यांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यावरील भार कमी करण्याचा निर्णय काँग्रेसश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसला नवे प्रभारी मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT