Karnataka Congress News : कर्नाटकात काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत मतदारांना आमिष दाखविल्याप्रकरणी वरुणाचे आमदार तथा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. (Karnataka High Court notice to Chief Minister Siddaramaiah)
सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांची आमदार म्हणून झालेली निवड अवैध ठरवण्यात यावी, अशी याचिका के. एम. शंकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली हेाती. त्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती सुनील दत्त यादव यांच्या एकसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायमूर्ती यादव यांच्या खंडपीठाने सिद्धरामय्या यांना नोटीस बजावली. त्यावरील पुढील सुनावणी ही एक सप्टेंबर रोजी होणार आहे.
कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस (Congress) आणि सिद्धरामय्या यांनी हमीपत्रांचे वाटप केले होते. हे सिद्धरामय्या यांच्या संमतीने केले गेले आहे. त्यामुळे मतदारांना आमिष दाखविल्याच्या कारणावरून वरुणा मतदारसंघातील आमदार सिद्धरामय्या यांना पदावरून अपात्र ठरविण्यात यावे, अशी याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २८ जुलै) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना नोटीस बजावली आहे.
मतदारांना आमिष दाखवण्यास लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम १२३ (२) हे मनाई करते. परंतु कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून हमीपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यातून मतदारांना अमिष दाखविण्यात आले, त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयात (High Court) के. एम. शंकर यांनी अर्ज दाखल केला हेाता.
संविधानातील तरतुदी आणि लोकप्रतिनिधी कायद्यातील नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप सिद्धरामय्या यांच्यावर करण्यात आलेला आहे. हमीपत्रे ही उमेदवार आणि काँग्रेसची आश्वासने आहेत. ती मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच झाली आहेत. त्यामुळे आमिष दाखविले म्हणून वरुणा मतदारसंघातून सिद्धरामय्या यांची आमदार म्हणून झालेली निवड ही अवैध ठरवावी, अशी मागणी शंकर यांनी अर्जाद्वार केली आहे.
दरम्यान, केएम शंकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती यादव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यातून सिद्धरामय्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी १ सप्टेंबर रोजी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.