Sudhir Mungantiwar- Chandrakant Patil Sarkarnama
विशेष

Chandrakant Patil News: ३३ कोटी वृक्षलागवड गैरव्यवहार चौकशी समितीचे अध्यक्ष बदलले; चंद्रकांतदादांकडे जबाबदारी

State Government Decision : तेहत्तीस कोटी वृक्षलागवडीत गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न आमदार रमेश कोडगावकर व इतर सदस्यांनी ३ मार्च २०२१ रोजी उपस्थित केला हेाता.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political News: राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवड गैरव्यवहार चौकशी समितीचे पुनर्गठण करण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्षपद आता संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असणार आहे. तसेच, ही समिती आता २१ जणांची असणार आहे. (Chandrakant Patil will investigate the 33 crore plantation malpractice)

तेहत्तीस कोटी वृक्षलागवडीत गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न आमदार रमेश कोडगावकर व इतर सदस्यांनी ३ मार्च २०२१ रोजी उपस्थित केला हेाता. त्यावेळी या वृक्ष लागवडीतील गैरव्यवहाराची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्षपद हे तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे हेाते. त्यात समितीमध्ये १७ सदस्य होते.

दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (uday Samant) यांनी या समितीचे पुनर्गठण करण्याचा प्रस्ताव विधानसभेत आज मांडला. त्याला विधानसभेत मंजुरी देण्यात आली. या समितीचे पुनर्गठण करण्यात आल्याने समितीच्या सदस्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या समितीचे अध्यक्ष बदलण्यात आले आहेत.

या चौकशी समितीचे अध्यक्ष इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे होते. आता त्यांच्याऐवजी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद सोपविण्यात आलेले आहे. तसेच, सदस्यसंख्याही १७ वरून वाढवून ती २१ करण्यात आली आहे. या समितीमध्ये दत्तात्रेय भरणे, ज्ञानराज चौगुले, प्रशांत बंब, महेश बालदी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या समितीला चौकशीसाठी मुदतवाढ देण्यावरून मात्र विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. त्याचा अहवाल पुढील अधिवेशानाच्या शेवटच्या दिवशी ठेवण्यात येईल, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले. या समितीचा अहवाल शेवटच्या दिवशी नाही तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ठेवावा, अशी आग्रही मागणी विरोधकांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT