CM Eknath Shinde Talk Show: मुख्यमंत्री शिंदे करणार 'मन की बात' ; 'मी मुख्यमंत्री बोलतोय' मधून देणार जनतेच्या प्रश्नांची उत्तरे..

Mi Mukhyamantri Boltoy CM Talk Show: शिंदे जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार ..
Cm Eknath Shinde
Cm Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'च्या धर्तीवर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

Cm Eknath Shinde
Pathardi Talathi Bribe Case: लाचखोर महिला तलाठ्यास तीन वर्षे कारावास ; तीन हजारांची घेतली होती लाच

नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा रेडिओवरील प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या डीडी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमातून शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला होता. आता मुख्यमंत्री शिंदेही संवाद साधणार आहेत.

Cm Eknath Shinde
Shetkari Karjmukti : तेलगंणा सरकारचा कित्ता महाराष्ट्र सरकारनं गिरवावा ! ; शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा..

फडणवीस यांच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ची सुरुवात शेतकऱ्यांशी संवाद साधून झाली होती. कार्यक्रमापूर्वी राज्य सरकारने या कार्यक्रमात कोणत्या प्रश्नांना उत्तरे हवी, यासाठी जनतेकडून प्रश्नांची मागणी केली होती. या कार्यक्रमासाठी व्हॉट्सअॅपवरून सुमारे १८ हजार प्रश्न-सूचना आल्या, तर सुमारे बाराशे ई-मेल आले होते. त्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली होती.

राज्याच्या विविध भागांतून तीस शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी मंत्रालयात बोलावण्यात आले होते. हा कार्यक्रम अखेरचा ठरला. त्यानंतर चित्रणच न झाल्याने हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता. आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com