In Chandrapur, BJP leaders Sudhir Mungantiwar and Kishor Jorgewar clash over Ganpati Visarjan mandap. Police install barricades to prevent violence between rival groups. Sarkarnama
विशेष

BJP Politics : 'मंडप' वही बना के दिखाया! भाजप आमदाराच्या गटाच्या हट्टापुढे प्रशासन हतबल; तगडा पोलीस बंदोबस्त

BJP Politics : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी उभारलेल्या मंडपावरून भाजप नेत्यांमध्ये संघर्ष पेटला. मुनगंटीवार-जोरगेवार गट आमनेसामने आल्याने पोलिस बंदोबस्त वाढवला गेला असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

Hrishikesh Nalagune

BJP Politics : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांवरून भाजपातील माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार गट आमनेसामने आले आहेत. या वादामुळे अखेर महापालिकेने हस्तक्षेप करून एका गटाला किमान 100 मीटर अंतरावर मंडप उभारण्याचे आदेश दिले.

मात्र भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांनी पालिकेच्या नोटीसीला पायदळी तुडवून दहा फुट अंतरावरच मंडप उभारला आहे. आता आज विसर्जनाच्या दिवशी दोन्ही गटात झोंबाझोंबी होऊ नये यासाठी आता दोन्ही मंडपांच्या मध्यात बॅरिकेड्स लावण्यात आले असून पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

लोकमान्य टिळक शाळेसमोर दरवर्षी मुनगंटीवार गटाकडून स्वागत मंडप उभारला जातो. यंदाही भाजपचे माजी महानगराध्यक्ष राहुल पावडे यांनी मंडपासाठी महापालिकेकडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. काही दिवसांतच जोरगेवार गटाचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांनीही त्याच ठिकाणी मंडपासाठी अर्ज दाखल केला. यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष चिघळला. वाद इतका टोकाला गेला की कार्यकर्ते थेट रस्त्यावर एकमेकांसमोर उभे ठाकले.

वातावरण तणावपूर्ण बनताच पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान आयुक्त विपिन पालीवाल यांनी तोडगा काढत पावडे यांना शाळेच्या उजव्या बाजूस तर कासनगोट्टवार यांना डाव्या बाजूस मंडपासाठी प्रमाणपत्र दिले. परिणामी दोन्ही मंडपांमध्ये सुरुवातीला अवघे 10 मीटर अंतर होते. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी महापालिकेला दोन्ही मंडपांमध्ये किमान 100 मीटर अंतर ठेवण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्तांनी कासनगोट्टूवार यांना पत्र देऊन जागा बदलण्याची नोटीस दिली. मात्र त्यांनी 100 मीटर अंतरावर मंडप नेण्यास नकार दिला. त्यांनी मुनगंटीवार यांच्या मंडपापासून अवघ्या 10 फुट अंतरावरच मंडप उभारायला सुरुवात केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे पोहोचला. तरीदेखील कासनगोट्टवार यांनी माघार घेतली नाही. शेवटी पोलिसांनी या दोन्ही मंडपांच्या मध्ये बॅरिकेड्स उभारले आहेत.

आयुक्तांची भूमिका संशयास्पद

■ महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांच्यामुळे शहरात काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिवंगत मातोश्रीच्या नावाने गांधी चौकातील गांधी पुतळ्यापासून अवघ्या 35 मीटर अंतरावर अम्मा चौकाला परवानगी दिली. पण पुरातत्त्व खात्याच्या हस्तक्षेपानंतर तिथले बांधकाम पाडण्याची नामुष्की पालिवाल यांच्यावर आली. आता मंडप परवानगीवरून सुद्धा भाजपच्या दोन गटांत वादाला सुरुवात झाली आहे.

या सर्व वादामागे पालिवाल यांचीच डोळेझाक कारणीभूत आहे असे म्हटले जाते. दरवर्षी लागणाऱ्या एका गटाच्या मंडपाला लागूनच दुसऱ्या गटाला परवानगी देण्याचे धाडस त्यांनी केले त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालीवाल नेमके कुणासाठी आणि कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT