मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शिवसेनेतील बंड राज्यात ऐतिहासिक ठरले. तब्बल 12 दिवसांच्या खंडानंतर त्यांच्यासोबत असलेले आमदार आज मुंबईत परत आले. या बारा दिवसात सत्तापालट झाला आणि स्वतः शिंदे मुख्यमंत्री झाले. या बंडात त्यांना 48 आमदारांना मोलाची साथ दिली. सुरत, गुवाहटी आणि गोवा असा प्रवास करत हे आमदार आज संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबईत पोहोचले. त्यांना आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोव्यात गेले होते. पणजी विमानतळापर्यंत त्यांच्यासोबत त्यांनी बसने प्रवास केला.
शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 20 जूनच्या रात्री बंड पुकारले. त्याच रात्री त्यांनी 23 हून अधिक आमदार हे सुरतला हवलवे. ही संख्या नंतर वाढत 48 पर्यंत केले. त्यात शिवसेनेचे 40 आमदार आणि आठ अपक्ष आहेत. या आमदारांची सर्व काळजी शिंदे यांनी घेतली. तोपर्यंत एकट्याने मुंबईत येऊन सारी सत्तासूत्रे ताब्यात घेतली. ते मुख्यमंत्री झाले. शपथविधी झाल्यानंतरही ते या आमदारांना भेटण्यासाठी गेले. कामकाजासाठी पुन्हा मुंबईत आले.
विधीमंडळ अधिवेशनासाठी या आमदारांना मुंबईत शनिवारी मुंबईत आणण्याची निर्णय झाला. हे आमदार आणताना धोका होता. त्यामुळे त्यांना आणण्यासाठी ते स्वतः गोव्यात गेले. गोव्यातून खास विमानाने त्यांना मुंबईत आणण्यात आले. शिवसैनिकांकडून रस्त्यावर निदर्शने झाल्यास किंवा कोणी आमदार इकडेतिकडे गेल्यास त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः शिंदे जातीने बसमध्ये हजर राहिले. त्यामुळे पोलिस यंत्रणाही दक्ष राहिली. विमानतळावर मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः बंदोबस्तावर लक्ष ठेवले. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेसाठी पोलिसही रस्त्यावर उतरल्याचे दिसले.
खुद्द शिंदे हे पहिल्या क्रमांकाच्या सीटवर बसल्याचे दिसले. त्यांच्याशेजारी भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे होते. शिंदे हे सातत्याने फोनवर बोलत होते. आमदारांच्या सुरक्षाव्यवस्थेची काय काळजी घेतली आहे, याचा आढावा घेत होते. त्यामुळे साहजिकच आमदारांनाही हुरूप आला. ते वीस तारखेला मुंबईतून सुरतला गेले तेव्हा शिंदे हे नगरविकास मंत्री होते. पण मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी आमदारांच्या प्रती आपला जिव्हाळा कायम ठेवत त्यांची पूर्ण व्यवस्था केल्याची भावना आमदारांनी त्यामुळे व्यक्त केली.
हे आमदार सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास विमानतळावर दाखल झाल्यानंतर लगेच हाॅटेल ताज प्रेसिडेंटमध्ये गेले. तेथे भाजप आमदारांची आणि त्यांची ऐकत्रित बैठक झाली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी होणार असल्याने त्याची रणनीती या बैठकीत ठरविण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.