Congress  Sarkarnama
विशेष

Congress News : भाजपला तब्बल 132 जागा पण काँग्रेसच्या 'त्या' विक्रमापासून कोसो दूर

Maharashtra Assembly elections Congress Won seats record : भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे 146 जागा लढवत हे यश मिळवले. त्यामुळे भाजपचा सर्वाधिक 90 टक्क्यांचा स्ट्राईक रेट राहिलेला आहे.

Roshan More

Congress News : विधानसभा निवडणुकीत महायुतीने महायुती 230 जागांवर ग्रँड विजय मिळवला आहे. त्यामध्ये भाजपला एकट्याला 132 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपला पहिल्यांदाच 130 चा आकडा पार करता आला. महायुती आणि भाजपचा हा ग्रँड विजय असला तरी सर्वाधिक आमदार विजयी होण्याच्या बाबत मात्र भाजप काँग्रेसच्या बरीच मागे आहे.

1972 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 222 आमदार विजयी झाले होते. महाराष्ट्र विधानसभा अस्तित्वात आल्यापासून तब्बल तीन वेळा काँग्रेसने 200 जागा आकडा पार केला आहे.

काँग्रेसचे 1962 च्या निवडणुकीत 215 आणि 1967 च्या निवडणुकीत 203 आमदार विजयी झाले होते. तर 1967 देखील काँग्रेसने सर्वाधिक 200 जागा जिंकल्या होत्या.1978, 1980 आणि 1985 या निवडणुकांमध्ये काँग्रेसने अनुक्रमे 168,186, 161 जागांवर विजय मिळवला होता.

भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक

भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे 146 जागा लढवत हे यश मिळवले. त्यामुळे भाजपचा सर्वाधिक 90 टक्क्यांचा स्ट्राईक रेट राहिलेला आहे. त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे.

काँग्रेसची ऐतिहासिक घसरण

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस हा सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला पक्ष आहे. 1995 नंतर काँग्रेसच्या जागांमध्ये घट होत होती. मात्र, 104 जागा लढवून केवळ 16 जागांवर यंदा काँग्रेसला विजय मिळवता आला. महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेसने विजय मिळवलेल्या या सर्वात कमी जागा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT