Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
विशेष

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांकडून माझ्या जिवाला धोका : सदाभाऊ खोत

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) माझ्या जिवाला धोका आहे, हे मी गृहमंत्र्यांना लेखी कळवणार आहे. विशेषतः पवार कुटुंबीयांकडून (Pawar) मला धोका आहे. कारण, ही माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण माझा प्राण गेला तरी चालेल पण, तुमची व्यवस्था आणि मस्तावालपणे लुटीच्या माध्यमातून उभारलेला चिरेबंदी वाडा पाडल्याशिवाय हा सदाभाऊ शांत बसणार नाही, असा इशारा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. (Danger to my life from NCP : Serious allegations of Sadabhau Khot)

पंचायत राज समिती गुरुवारी (ता. १६ जून) सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर होती. ती समिती सांगोल्यात आल्यानंतर अशोक शिनगारे या हॉटेल चालकाने माजी आमदार सदाभाऊ खोत यांना अडवून अगोदर माझे जेवणाचे बिल द्या मगच पुढं जावा, अशी मागणी केली. त्यानंतर संबंबधित हॉटेनचालकाविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची फिर्याद रयत क्रांती संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष भारत चव्हाण यांनी दिली आहे. त्यानंतर आज सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी वरील आरोप केला.

ते म्हणाले की, सांगोल्यातील प्रकारामागे टोमॅटोसारखे गाल असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता आहे. राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याला या प्रकरणाचं व्हिडिओ शूटींग काढून व्हायरल करायचं होतं. पण, राष्ट्रवादीच्या या नेत्याला सांगतो की, अशा पद्धतीने षडयंत्र रचून सदाभाऊंचा आवाज दाबता आणि थांबवता येणार नाही. त्यांचा अनेक एक वेगळा डाव होता, त्याचा मला सुगावा लागला. पण, पोलिसांना का लागला नाही. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणला; म्हणून ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, रात्री नऊपर्यंत सांगोल्याचे पोलिस निरीक्षक गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. मी सांगूनही पीआय गुन्हा दाखल करत नव्हते. तो चुकला आहे, माफी मागत आहे, त्यामुळे गुन्हा कशाला दाखल करायचा, असे पोलिस मला सांगत होते. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हेही पाहावे लागेल.

माझ्या तक्रारीनंतर हॉटेलचालक अशोक शिनगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या समोर बनावट पद्धतीने राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोण षडयंत्र करत असेल, आम्हाला बदनाम करत असेल तर त्याची पार्श्वभूमी पोलिसांनी तपासून त्याच्यावर मोका लावणार का, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

टोमॅटोसारखं गाल असलेल्या नेत्याचे बगलबच्चे आजपासून बोलायला लागतील, तेव्हा तो नेता कोण आहे, हे आपोआप पुढे येणार आहे. त्या ठिकाणी गाईडलाईन्स करायला काही लोक तयार होते. त्यांना मी ओळखतो. त्याबाबत मी गृहमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार आहे, असेही सदाभाऊ खोत यांनी बोलताना स्पष्ट केले.

हॉटेलचालक शिनगारे यांच्यावर सहा ते सात गुन्हे दाखल आहेत. या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे, याचा आम्ही शोध घेतला आहे. पण शिनगारे यांच्या फोनवर आलेले कॉल्स रेकॉर्ड काढा, त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आणल्यानंतर पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या मोबाईलवर कोणाचे फोन आले, त्याचे रेकॉर्ड तपासले पाहिजे. त्यांचा अनेक एक वेगळा डाव होता, त्याचा मला सुगावा लागला. पण पोलिसांना का लागला नाही, असा सवालही खोत यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT