सदाभाऊ, आधी हॉटेलची उधारी द्या; मगच पुढं जावा : सांगोल्यात खोतांना अडवले!

सदाभाऊ खोत यांनी या हाॅटेल मालकाची कशीतरी समजूत काढून स्वतःची सुटका करून घेतली.
Sadabhau Khot
Sadabhau Khotsarkarnama
Published on: 
Updated on: 

सांगोला : ‘‘भाऊ, आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जावा,’’ असे म्हणत सांगोला (Sangola) तालुक्यातील एक हॉटेलचालक व शेतकरी संघटनेच्या माजी पदाधिकारी अशोक शिनगारे यांनी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याशी पंचायत समितीच्या आवारात गाडीतून उतरताच हुज्जत घातली. त्यामुळे त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. (In Sangola, hotelowner stopped Sadabhau Khot for money)

पंचायत राज समितीचे पथक आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये आमदार अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे व आमदार सदाभाऊ खोत होते. तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीची पाहणी केल्यानंतर सांगोला तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयाकडे हे पथक आले.

Sadabhau Khot
तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का? : रासपचे रत्नाकर गुट्टे सीईओंवर संतापले!

सर्वप्रथम आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली. गाडीमधून आमदार सदाभाऊ खोत उतरताच मांजरी (ता. सांगोला) येथील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे त्यावेळचे पदाधिकारी असलेले व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही.’ असे शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले.

Sadabhau Khot
खडसेंना तिकिट दिलं नसतं तर भाजप विधान परिषद बिनविरोध करणार होती? दानवे म्हणाले...

हॉटेलचालक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांना अडविल्याने पंचायत समिती परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यात सदाभाऊ खोतांनाही काय बोलावे सुचेना. मात्र, सदाभाऊ खोत यांनी या हाॅटेल मालकाची कशीतरी समजूत काढून स्वतःची सुटका करून घेतली. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीमध्ये आमदार सदाभाऊ खोत हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले होते. त्यावेळी सांगोला तालुक्यातील मांजरी या गावचे  असलेले अशोक शिनगारे यांचे हॉटेलची उधारी होती. शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी असल्याचे अशोक शिनगारे यांनी आपल्या उधारीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.

सदाभाऊ म्हणतात ‘मी त्यांना ओळखत नाही’

बैठकीनंतर बाहेर आलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना याबाबत विचारले असता, 'मी त्यांना ओळखत नाही . तुम्हाला काय माहित असेल तर मला सांगा' असे म्हणत त्यांनी हा विषय टाळून नेण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Judge Ajit Mote Judge Dies Due to Electric Shock
sachin kalyanshetti-Siddharam Mhetre
Prashant Paricharak
Schin kalyanshetti -Siddharam Mhetre