Delhi CM Rekha Gupta attacked during public durbar; youth slapped and dragged her by hair. Incident raises political security concerns, recalling earlier attacks on Arvind Kejriwal. Sarkarnama
विशेष

Delhi CM Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर एवढा राग का? रेखा गुप्तांआधी केजरीवालांवर तब्बल 9 वेळा हल्ला

Delhi CM Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात तरुणाने कानाखाली मारून केस ओढत फरपटत नेले. त्या जखमी झाल्या असून सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Hrishikesh Nalagune

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. जनता दरबार सुरु असताना एका तरुणाने शर्मा यांना कानाखाली मारल्या. त्यांचे केस ओढून त्यांना फरपटत नेले. त्यामुळे त्या जखमीही झाल्या आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार तो गुजरातचा रहिवासी आहे.

दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यावरही मुख्यमंत्रीपदावर असताना तब्बल 7 वेळा आणि पदावर नसताना 2 वेळा हल्ला झाला होता. त्यामुळे नागरिकांचा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर एवढा राग का आहे? थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला होतोच कसा? असे अनेक सवाल विचारला जातो.

केजरीवाल यांच्यावर आतापर्यंत 9 वेळा हल्ला :

9 महिन्यांपूर्वी दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यावर पाणी फेकले होते. त्यानंतर समर्थकांनी आरोपीला पकडून मारहाण केली होती. संबंधित व्यक्तीचे नाव अशोक झा होते आणि तो खानपूर डेपोमध्ये बस मार्शल म्हणून तैनात होता. मार्च 2022 मध्ये गुजरात दौऱ्यावर असताना अरविंद केजरीवाल यांच्यावर कोणीतरी प्लास्टिकची बाटली फेकली. केजरीवाल यांना बाटलीचा धक्का बसला नाही. मागून फेकलेली बाटली त्यांच्या अंगावरून गेली आणि दुसऱ्या बाजूला गेली. ही घटना घडलेल्या ठिकाणी गर्दी होती, त्यामुळे बाटली फेकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही.

4 मे 2019 रोजी मोतीनगर येथील रोड शो दरम्यान केजरीवाल यांना एका तरुणाने थप्पड मारली होती. त्या तरुणाने केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांना थप्पड मारली होती. त्याआधी नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्ली सचिवालयात एका व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर लाल मिरची टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. जानेवारी 2016 मध्ये ऑड-इव्हन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशानंतर जल्लोष सुरु असताना केजरीवाल यांच्यावर एका महिलेने शाई फेकली होती.

8 एप्रिल 2014 रोजी दिल्लीतील सुलतानपुरी येथे रोड शो अरविंद केजरीवाल यांना थप्पड मारण्यात आली. केजरीवाल पक्षाच्या उमेदवार राखी बिर्ला यांच्यासाठी परिसरात रोड शो करत होते. या दरम्यान एका ऑटो चालकाने प्रथम त्यांना हार घातली आणि नंतर त्यांना दोनदा कानशि‍लात लगावली होती. 4 एप्रिल 2014 रोजीही दक्षिणपुरी परिसरात केजरीवाल यांना आपच्या एका कार्यकर्त्याने धक्काबुक्की केली. यानंतर केजरीवाल यांनी राजघाटावर जाऊन मूक निषेध केला. या मारहाणीत त्यांचा डावा डोळा आणि आजूबाजूला सूज आली होती.

मार्च 2014 मध्ये, केजरीवाल वाराणसीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर होते. यादरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर शाई आणि अंडी फेकली. नोव्हेंबर 2013 मध्ये, अण्णा हजारे यांचे समर्थक असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर शाई फेकली होती. हा केजरीवाल यांच्यावर झालेला पहिला हल्ला होता. त्यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुढील महिन्याभरात निवडणूक जिंकून ते दिल्लीचे मुख्यमंत्री बनले होते.

पण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर एवढा राग का आहे? लोक मुख्यमंत्र्यांपर्यंत एवढे सहजासहजी कसे पोहचतात? असे सवाल विचारले जातात. मुळात दिल्ली हे एक राज्य विधानसभा अस्तित्वात असलेले केंद्रशासित राज्य आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही. इथले मतदारसंघही अत्यंत छोटे आहेत. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत मुख्यमंत्र्यांना मोठी सुरक्षा नसते. परिणामी लोकांना मुख्यमंत्र्यांपर्यंत सहज पोहचता येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT