CM Rekha Gupta Attacked: CM रेखा गुप्ता यांना कानाखाली मारल्या; भाजपच्या दिल्लीतील जनता दरबारात हल्लेखोराचा गोंधळ

Delhi CM Rekha Gupta Assaulted During ‘Jan Sunwai’ Programme: दिल्लीच्या भाजप CM रेखा गुप्ता यांच्यावर त्यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारातच एका व्यक्तीने हल्ला केल्याने गोंधळ उडाला.
Delhi Chief Minister Rekha Gupta Attacked
Delhi Chief Minister Rekha Gupta AttackedSarkarnama
Published on
Updated on

Delhi CM Attacked: भाजपच्या दिल्लीतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबार हल्ला झाला आहे. निवेदन देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारल्या, त्यानंतर त्याने त्यांच्या केस ओढून फरफटत नेले. यामुळे रेखा गुप्ता जखमी झाल्या आहेत. जनता दरबारात निवेदन देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने असा प्रकार केल्याने एकच गोंधळ उडाला.

दिल्ली पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरानं हा प्रकार कशातून केला, याची चौकशी पोलिस करत आहे. दरम्यान, दिल्ली भाजप याप्रकारावरून आक्रमक झाली असून, कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता, हल्लेखोर व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, यावर सूचक टिप्पणी केली आहे.

भाजप (BJP) मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीतील सिव्हील लाइन परिसरातील कॅम्प कार्यालयात जनता दरबार बोलावला होता. रेखा गुप्तांसमोर लोक तक्रारीची निवेदन देत होते. त्याचवेळी एक जणाने निवेदन देताच, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारल्या. यानंतर त्यांची केस पकडत, ओढले. यात रेखा गुप्ता जखमी झाल्याची माहिती मिळते.

हल्लेखोरानं या जनता दरबारात चांगलाच गोंधळ घातला. दिल्ली (Delhi) पोलिसांनी धाव घेत, हल्लेखोराला ताब्यात घेतलं. पोलिस हल्लेखोर कोण व्यक्ती आहे, याची चौकशी करत असून, हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला याची उकल करत आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता हल्लेखोराच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. वैद्यकीय पथक पाचारण करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर रेखा गुप्त किती जखमी आहेत, हे कळेल.

Delhi Chief Minister Rekha Gupta Attacked
Balasaheb Thorat On Election : निवडणूक आयुक्तांवर महाभियोग? राजकीय 'स्टाइल', प्रेसचा 'ड्राफ्ट', राहुल गांधींना नोटीस अन् थोरातांचा 'बोचरा' सल्ला !

मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारी व्यक्तीचे वय 35 वर्षे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिल्ली भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. भाजप नेते रमेश बिधुरी यांनी रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न सार्वजनिक सुनावणीला अडथळा आणण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Delhi Chief Minister Rekha Gupta Attacked
Pune Lonavala Local : CM फडणवीसांचा मोठा निर्णय! खासदार मोहोळ यांच्या पुढाकाराने पुणेकरांना मिळाली 'लोकल'ची गिफ्ट

भाजप प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी संबंधित व्यक्ती नैराश्यात गेलेल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सूचक वक्तव्य केलं आहे. पोलिस तपासातून सर्व काही बाहेर येईल. हा मुख्यमंत्र्यांवरचा हल्ला आहे. पोलिसांनी तपास करू सत्य काय आहे, हे सर्वांसमोर आणावं, असे म्हटलं आहे.

काँग्रेसकडून निषेध

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत निषेध केला आहे. मुख्यमंत्री या संपूर्ण दिल्लीचे प्रतिनिधीत्व करतात. या घटनेने महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहेत. मुख्यमंत्रीच सुरक्षित नाही तर सामान्य महिला दिल्लीत कशी सुरक्षित असेल, असा सवाल देवेंद्र यादव यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com