Delhi Historic protests AI Generated image
विशेष

Delhi Historic protests : दिल्लीत सरकारला हादरवणारी 6 ऐतिहासिक आंदोलने; सर्वसामान्यांनी केले होते सळो की पळो!

Major public movements in Delhi history : दिल्लीतील अशा 6 ऐतिहासिक आंदोलनांची माहिती जाणून घ्या, ज्यांनी सरकारांना झुकण्यास भाग पाडले आणि भारतीय राजकारणावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला.

Rashmi Mane

शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, वारंवार समोर येणारी पेपरफुटीची प्रकरणे आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचाही 17 वा दिवस आहे. त्यामुळे या आंदोलनामुळे देशभरात चर्चा रंगली आहे. दिल्लीतील आंदोलनांची परंपरा पाहिली तर अनेक वेळा जनतेच्या दबावामुळे सरकारला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले आहेत.

देशाची राजधानी असलेली दिल्ली ही केवळ राजकीय सत्तेचे केंद्र नाही, तर लोकशाही संघर्षांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. येथे झालेल्या अनेक आंदोलनांनी देशाच्या राजकारणावर आणि धोरणांवर दूरगामी परिणाम घडवून आणले आहेत. जाणून घेऊया दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांबद्दल...

महेंद्रसिंह टिकैत आंदोलन

1988 मध्ये भारतीय किसान युनियनचे नेते महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले होते. बोट क्लब परिसरात झालेल्या या विशाल आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात आला.

अण्णा हजारे आंदोलन

2011 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात उभारलेल्या जनआंदोलनाने संपूर्ण देशाला एकत्र आणले. जनलोकपाल कायद्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर उपोषण केले. लाखो नागरिकांच्या पाठिंब्यामुळे हे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर गाजले आणि देशाच्या राजकीय समीकरणांवर त्याचा प्रभाव दिसून आला.

निर्भया आंदोलन

2012 मध्ये दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर नागरिकांचा संताप उसळला. इंडिया गेट आणि जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. या जनआक्रोशानंतर महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या.

शेतकरी आंदोलन (2020–21)

2019 आणि 2020 दरम्यान शाहीन बाग आंदोलन देशभर चर्चेत राहिले. CAA, NRC आणि NPR विरोधात महिलांनी सुरू केलेले हे शांततापूर्ण आंदोलन 100 दिवसांपेक्षा अधिक काळ चालले. या आंदोलनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले.

शाहीन बाग आंदोलन (2019–20)

2020 ते 2021 या काळात कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाने दिल्लीच्या सीमांवर मोठा संघर्ष उभा केला. अनेक महिन्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने अखेर तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

दिल्लीतील आंदोलने ही केवळ निषेधाची साधने नसून लोकशाहीतील जनशक्तीचे प्रतीक मानली जातात. संसद, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय माध्यमांचे केंद्र असल्यामुळे येथे होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाचा देशव्यापी प्रभाव पडतो. जंतरमंतर, रामलीला मैदान, इंडिया गेट आणि दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनांनी अनेकदा सरकारला आपली भूमिका बदलण्यास भाग पाडले असून भारतीय लोकशाहीची ताकद दाखवून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT