Devendra Fadanvis Sarkarnama
विशेष

Doctorate Degree To Fadnavis: मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ फडणवीसही बनले डॉक्टर; उपमुख्यमंत्र्यांना जपानमधील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केली आहे. त्याबाबतची घोषणा विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मानद डॉक्टरेटचा मान मिळाला आहे. (Devendra Fadnavis has been awarded doctorate by Koyasan University in Japan)

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य, तसेच महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे.

जपानमधील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केल्यामुळे फडणवीस आता यापुढे डॉ देवेंद्र फडणवीस या नावाने ओळखली जातील. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापाठाने डी. लिट जाहीर केली आहे. त्यामुळे एकच वेळी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी उपमुख्यमंत्री यांना डॉक्टरेट मिळणे, हा तसा दुर्मिळ योग म्हणावा लागेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारर्दितीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही मानद डी. लिट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते २८ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT