Once criticized by Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis is now hailed as the ‘Maratha Reservation Hero’; a decade-long journey of his role in the Maratha quota issue. sarkarnama
विशेष

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटच्या GR शिवाय CM फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत काय केले?

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी तीन वर्षे सतत टीका केलेले देवेंद्र फडणवीस आता मराठा आरक्षणाचे हिरो ठरले आहेत. मागील १० वर्षांत फडणवीसांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येतो.

Hrishikesh Nalagune

Maratha Reservation :मागील 3 वर्षांच्या काळात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सर्वात जास्त कोणावर टीका केली असेल तर ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. यापूर्वीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, तरी जरांगे पाटील यांनी टीका केली ती फडणवीस यांच्यावरच. त्यांनाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असा त्यांच्या टीकेचा सूर होता. एकूणच जरांगे पाटील यांच्या डोक्यात फडणवीस यांचे नाव फीट बसले होते.

पण हेच देवेंद्र फडणवीस आता जरांगे पाटील यांच्यासाठी हिरो झाले आहेत. पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने जीआर काढून मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार दाखले देणार असल्याचे सांगितले आहे. तर हा मराठ्यांचा आंदोलनाचा मागील 75 वर्षातील मोठा विजय आहे, असे वर्णन जरांगे पाटील यांनी केले आहे. भाजपमधील मंत्र्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा प्रश्न सोडवला, असे म्हणत याचे श्रेय फडणवीस यांनाच दिले आहे.

फडणवीस स्वतः देखील यापूर्वीही आपणच मराठा समाजासाठी सर्व काही केले असल्याचे सांगत होते. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी दहा वर्षात मराठा समाजासाठी काय केले? याबाबतचा घेतलेला आढावा...

फडणवीस यांनीच मराठा समाजाला कसा न्याय दिला, फडणवीस हेच मराठा समाजाचे कसे हिरो आहेत, असे सांगणारी एक जाहिरात भाजपने गतवर्षी प्रकाशित केली होती. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमधील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात दिली होती. यात 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामांचा सविस्तर तपशीलच देण्यात आला होता.

फडणवीस यांनी सर्वात महत्वाचे म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न दोनवेळा मार्गी लावला. याबाबतचा दावा स्वतः फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. पहिल्यांदा 2018-19 मध्ये फडणवीस यांनी मराठा समाजाला एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देऊ केले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवून दाखवले आणि सर्वोच्च न्यायालयातही त्यांचे सरकार असेपर्यंत धक्का लागला नव्हता. मात्र ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले, असे फडणवीस म्हणाले होते.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्याचा दावा या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. याबाबत सध्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. मात्र न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही. याशिवाय 14 वेगवेगळ्या योजना आणि निर्णयांचा उल्लेख करत या जाहिरातीमध्ये फडणवीस यांनी केलेल्या कामाची यादी देण्यात आली होती.

काय म्हटले होते जाहिरातीमध्ये?

  • एकूण अधिसंख्य पदे भरली : सुमारे 4500

  • मृत आंदोलकांच्या वारसदारांना मदत :

मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या 42 आंदोलनकर्त्यांपैकी पात्र 35 वारसांना एसटीत नोकरी.

या 35 कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाख प्रदान

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजना:

एकूण लाभार्थी : 77,381

6112.90 कोटींचे कर्ज

637.86 कोटी रुपये व्याज परतावा

गट कर्ज व्याज परतावा योजना :

एकूण लाभार्थी 649

व्याज परतावा 13.12 कोटी

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना :

एकूण लाभार्थी 649

व्याज परतावा 13.12 कोटी

महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा :

11 हजार 393 कोटी विद्यार्थ्यांना 45 कोटी रुपये

  • डॉ. पंजाबराव देशमुख वस्तिगृह योजना :

3 लाख 79 हजार 373३ विद्यार्थ्यांना 1 हजार 213 कोटी रुपये वितरित

  • कौशल्य प्रशिक्षण :

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त विकास 27 हजार 346 विद्यार्थ्याचे प्रशिक्षण सुरु

सारथीतर्फे 35 हजार 726 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण

  • सारथी राष्ट्रीय छात्रवृत्ती योजना :

युपीएससीमध्ये 51 उमेदवार यशस्वी

12 आयएएस, 15 आयपीएस, ८ आयआरएस 1 आयएफएस 12 इतर सेवा

एमपीएससीत 304 उमेदवार यशस्वी

एकूण 2109 विद्यार्थ्यांना 87 कोटी रुपये

  • सारथी विभागीय कार्यालयांसाठी (छत्रपती शिवाजी महाराज संकुल) एकूण आठ विभागांत शासनाकडून विनामूल्य जमिनी :

सारथी पुणे कार्यालय - 42.70 कोटी/ डिसेंबर 2023 अखेरीस काम पूर्ण

सारथी खारघर - 119.28 कोटी रुपये

सारथी उपकेंद्र - कोल्हापूर 146.38 कोटी रुपये

सारथी नाशिक - 158.99 कोटी रुपये

छत्रपती संभाजीनगर - 140.24 कोटी रुपये

लातूर - 172.86 कोटी रुपये

नागपूर - 204.64 कोटी रुपये

एकूण 1015.10 कोटी रुपये

(या प्रत्येक ठिकाणी 300 अभ्यासक, 500 मुले आणि 500 चे वस्तिगृह असणार)

  • श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडो-जर्मन टूटरूम प्रशिक्षण :

146 उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण, 644 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु

  • 9 ते 11 साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना :

2023 मध्ये 32, 539 विद्यार्थ्यांना 31.23 कोटी रुपये

2024 मध्ये 44 हजार 102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये

  • महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना :

4 जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळाची मान्यता

12 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध

दरवर्षी 75 विद्यार्थी

एमएससी 60 लाख तर पीएचडीसाठी 1.60 कोटी

  • छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 50 हजार प्रती प्रकाशित :

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यामध्ये वितरित

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT