Narendra Modi Nitish Kumar Bihar Election.jpg Sarkarnama
विशेष

Bihar Election Results: बिहारच्या विजयात महाराष्टाचा मोठा वाटा; भाजपच्या दोन नेत्यांनी एकदा नव्हे तर दोनदा राजकारण फिरवलं

Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात महागठबंधनचा सुपडासाफ झाला आहे. एनडीएच्या त्सुनामीमध्ये सर्वच विरोधी पक्षांची वाताहत झाल्याचं पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या जोडीची रणनीती यशस्वी ठरली असून बिहारच्या जनतेनं भाजप अन् जेडीयूच्या राजकारणालाच विजयी कौल दिला आहे. या विजयात महाराष्ट्रातील नेत्याचांही मोठा वाटा राहिला आहे.

Deepak Kulkarni

Bihar News: बिहारच्या निवडणुकीत निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले होते. या निवडणुकीत भाजप अन् जेडीयूच्या एनडीएची वाटचाल ही प्रचंड मोठ्या बहुमतासह सत्तेच्या दिशेनं सुरू आहे. तर आरजेडी, काँग्रेस यांच्या महागठबंधनची अक्षरश:दाणादाण उडाल्याचेच सध्या हाती असलेल्या निकालावरुन दिसून येत आहे. बिहार विधानसभेच्या 243 पैकी तब्बल 202 जागांवर एनडीए विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे समोर येत आहे, तर महागठबंधन सध्या 35 जागांवर पुढे आहे. पण 2020 असो की 2025 भाजपला बिहार (Bihar Election Results) जिंकून देण्यात महाराष्ट्राच्या दोन नेत्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात महागठबंधनचा सुपडासाफ झाला आहे. एनडीएच्या त्सुनामीमध्ये सर्वच विरोधी पक्षांची वाताहत झाल्याचं पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या जोडीची रणनीती यशस्वी ठरली असून बिहारच्या जनतेनं भाजप अन् जेडीयूच्या राजकारणालाच विजयी कौल दिला आहे. या विजयात महाराष्ट्रातील नेत्याचाही मोठा वाटा राहिला आहे.

बिहार विधानसभेच्या 2020 च्या निवडणुकीसाठी भाजपनं निवडणूक प्रभारी म्हणून तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. या निवडणुकीत 243 जागांपैकी एनडीएने 125 जागा जिंकून आपली सत्ता वाचवण्यात यश मिळवलं होतं. त्यावेळी 75 जागा जिंकून आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता.

74 जागांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. जेडीयूला 43, काँग्रेसला 19, डाव्यांना 16, एलजेपीला 1, व्हीआयपीला 4, एआयएमआयएमला 5, ​​एचएएमला 4 , बसपाला 1 जागा आणि अपक्षांना 1 जागा मिळाली होती. या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेल्या भाजपच्या यशात फडणवीसांचा मोठा वाटा होता.

बिहार विधानसभा 2025 निवडणुकीचा निकाल शुक्रवारी(ता.14) जाहीर होत आहे.एक्झिट पोलमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येत असल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे निकालाच्या दिवशीही एनडीएने प्रचंड बहुमताकडे वाटचाल करत आघाडी महागठबंधनला पराभवाची धूळ चारली आहे. यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी व राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) हे होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपसह एनडीएनं बिहारमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.

विनोद तावडे भाजपचे निवडणूक प्रभारी असलेल्या विनोद तावडेंच्या नेतृत्वात जेडीयू आणि भाजप यांची युती असलेल्या एनडीएनं तब्बल 202 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, तेजस्वी यादव यांच्या राजद आणि काँग्रेसची आघाडी असलेल्या महागठबंधन 35 जागांवर आघाडीवर आहे. या विजयमागं तावडेंनी जानेवारी 2024 रोजी अर्थात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अन् नितीश कुमार यांना पुन्हा एनडीएमध्ये एकत्र आणलं. या भाजप आणि जेडीयूची पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता आणण्यात तावडे यांनी पडद्यामागे मोठी भूमिका निभावल्याची चर्चा आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक होते. फडणवीसांनी सहा विधानसभा मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. या सभांचा एनडीएला चांगलाच फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील जवळपास 61 मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार केला होता. त्यापैकी आता 49 मतदारसंघांवर त्यांच्या भाषणांचा मोठा प्रभाव पडल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभेतील एनडीएला मिळालेल्या यशावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘मी बिहारच्या जनतेचे आणि सर्व मतदारांचे आभार मानतो. बिहारने पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. चिराग पासवास, मांझी अशी आमची युती होती, त्याला चांगला प्रतिसाद जनतेले दिला. यातून जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेचा असलेला विश्वास दिसून आला आहे.’

फडणवीस यांनी राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला बिहारच्या जनतेनं उत्तर दिल्याचं टीका केली आहे. ते संविधानिक संस्थांचा अपमान करत आहेत. ते अपमान थांबवत नाहीत, तोपर्यंत त्यांची अवस्था अशीच असेल. काँग्रेसला आणि त्यांच्या मित्र पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांचे सर्व मुद्दे फेल ठरले आहेत. हे खोटारडे लोक असल्याचं म्हणत ही मंडळी जोपर्यंत सत्य स्वीकारत नाही, तर त्यांचे पतन सुरूच राहील,असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT