Pankaja Munde Sarkarnama
विशेष

Pankaja Munde News : पंकजा मुंडेंची नाराजी भाजपला अडचणीत आणू शकते?

Maharashtra politics News : महाराष्ट्रात भाजपमध्ये जनाधार असलेल्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांची ओळख आहे.

Amol Jaybhaye

Pankaja Munde Latest news : मी लोकांसाठी राजकारणात आले आहे. माझ्या भूमिका स्पष्ट असतात. मात्र, असा काय गुन्हा केला त्यामुळे माझ्यावर वनवासात जाण्याची वेळ आली आहे. याबाबत मी माझ्या नेत्यांना भेटणार, असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यावरुन भाजपमध्ये (BJP) पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा आज (३ जून) स्मृतिदिन आहे. त्यानिमीत्ताने पंकजा परळी येथील गोपीनाथ गडावर बोलत होत्या. या वेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, ''केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून माझ्याबाबत तुमच्या मनात काय सुरू आहे, हे थेट विचारणार आहे. यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. आता पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.''

पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये पराभव झाला. त्यानंतर पक्षाने त्यांना अनेक वेळा डावलले असल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रीमंडळातील विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याच्या मुद्यावरून मुंडे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही पंकजा यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही पंकजा मुंडे यांच्यासाठी काँग्रेसचे (Congress) दरवाजे उघडले असल्याचे सांगितले. तसेच शिंदे गटानेही त्यांना ऑफर दिली आहे. भाजप गोपीनाथ मुंडेंच्या (Gopinath Munde) मुलीला डावलत आहे, असा मेसेज राज्यात जाणे भाजपला परवडणारे नाही.

महाराष्ट्रात भाजपमध्ये जनाधार असलेल्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांची ओळख आहे. भाजप हा पक्ष माझ्या वडिलांनी उभा केला आहे. तो माझा पक्ष आहे, असे पंकजा आवर्जून अनेक सभांतून सांगतात. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भापजला एक वेगळी ओळख दिली. त्यामुळे भाजपचा मतदार असला तरी मुंडे नावाबद्दल मतदारांच्या मनामध्ये सहानुभूती आहे. त्यातच वंजारी समाजाचे एकगठ्ठा मतदान हे भाजपला होते. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपला ही हक्काची मते मिळतात. तसेच गोपीनाथ मुंडे यांनी जोडलेला ओबीसी समाजही भाजपच्या मागे आहे.

पंकजा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे पक्षाला नुकसान होऊन शकते. त्यांच्या नियमित नाराजीच्या चर्चाही भाजपच्या पथ्यावर पडणाऱ्या नाहीत. या नियमितच्या चर्चांमुळे पंकजा यांचे कार्यकर्ते भाजपवर नाराज होऊ शकतात. यामुळे पंकजा यांच्या नाराजीवर भाजपला तोडगा काढावा लागेलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT