Nana Patole_Balasaheb Thorat Sarkarnama
विशेष

Nagar Congress Committee : नाना पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना दे धक्का : नगरची अख्खी जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त

थोरातांशिवाय नगर काँग्रेसचे पान हलत नाही. शिवाय कमिटीवर बहुतांश थोरात समर्थक आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा दिल्याप्रकरणी नगर (nagar) जिल्हा काँग्रेस कमिटीच (Congress) बरखास्त (Dismissal) करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जाहीर केला आहे. नगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करून पटोले यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना दणका दिल्याचे बोलले जात आहे. कारण, थोरातांशिवाय नगर काँग्रेसचे पान हलत नाही. शिवाय कमिटीवर बहुतांश थोरात समर्थक आहेत. (Dismissal of nagar District Congress Committee : Nana Patole's announcement)

नगरची काँग्रेस कमिटी बरखास्त करताना नाना पटोले यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने नगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. तसेच, नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांना यापूर्वीच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

Congress Letter

वास्तविक पाहता काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे हे कर्जत तालुक्यातील आहेत. ते बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत. थोरातांमुळेच साळुंखे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण्यात आल्याचे म्हटले जाते. शिवाय नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते हे बाळासाहेब थोरात हेच आहेत. त्यामुळे नगर काँग्रेसवर थोरातांचा वरचष्मा हेाता. आता ती काँग्रेस कमिटीच बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे तो थोरातांना दणका मानला जात आहे. नगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्तीचा निर्णय थोरात यांच्याशी विचारविनिमय करून घेण्यात आला आहे, याची पुष्टी मिळू शकलेले नाही.

काँग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पाटील यांना पाठिंबा न देता नगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष साळुंखे यांना १७ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस देऊन दोन दिवसात खुलासा करण्याचा आदेश दिला होता. मात्र, ७ दिवसानंतरही त्यांनी खुलासा केला नाही, त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणारे जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर आज संपूर्ण नगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे, असे पटोले यांनी मुंबईत बोलताना सांगितले.

चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीबाबत २ फेब्रुवारीला निर्णय होणार

चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. या पोटनिवडणुकीबाबत निर्णय झालेला आहे. पण, २ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांची या विषयावर बैठक होणार आहे आणि या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय होईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT