Eknath Shinde-Amit Shah Sarkarnama
विशेष

Cabinet expansion News : भाजपश्रेष्ठींनी वगळायला सांगितलेले शिंदे गटाचे पाच मंत्री कोणते?

सरकारनामा ब्यूरो

BJP News : समाधानकारक काम न केलेल्या शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून वगळा, असा आदेश भाजपश्रेष्ठींनी दिला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झाली आहे. बंडाच्या वेळी खंबीरपणे साथ देणाऱ्या सहकाऱ्यांकडून अवघ्या दहा महिन्यांत मंत्रिपद कसे काढून घ्यायचे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पडला आहे, त्यामुळेच राज्यातील विस्तार लांबणीवर पडल्याची माहिती आहे.

राज्यातील मंत्र्यांच्या कामावर भाजपची (BJP) एक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्या यंत्रणेमार्फत राज्यातील मंत्र्यांचे अहवाल भाजप हायकमांडकडे पाठविले जातात. त्या यंत्रणेकडून दिलेल्या अहवालामध्ये शिंदे गटातील (Eknath Shinde) पाच मंत्र्यांच्या कामाबाबत नकारात्मक उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. त्या अहवालाचा आधार घेऊनच भाजपच्या श्रेष्ठींनी शिंदे यांना ही सूचना केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या नाव असल्याची चर्चा आहे. या सर्व मंत्र्यांनी बंडाच्या वेळी एकनाथ शिंदे यांना खंबीरपणे साथ दिली. यातील चौघे तर अगोदरच्या सरकारमध्येही मंत्री होते, त्यामुळे त्यांना डावलण्याचा मोठी अवघड कामगिरी शिंदे यांच्यावर येऊन पडली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, भाजपचा शिंदे गटावर दबाव आहे. मी हे आठ जुनलाच सांगितले होते. चार मंत्र्यांना काढा ते भ्रष्ट आहेत किंवा अकार्यक्षम आहेत. असे जे चार मंत्री आहेत त्यांची नावे माझ्याकडे आहेत. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष वेगळे आहेत ना, मग भाजपचे नेतृत्व त्यांच्यावर दबाव आणते आहे की यांना काढा, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ना, पण भाजपचा दबाव आहे. मी हे आधिच सांगितले होते. माझ्याकडे अंतर्गत माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT