Bhai Jagtap News : ...म्हणून भाई जगतापांना काँग्रेसने हटवले; गायकवाडांसमोर आहे 'हे' मोठे आव्हान

Varsha Gaikwad News : मुंबईतील सर्व नेत्यांना एकत्र घेऊन वर्षा गायकवाड यांना काम करावे लागणार आहे.
Varsha Gaikwad and 
Bhai Jagtap
Varsha Gaikwad and Bhai JagtapSarkarnama

Mumbai Politics : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांना हटवले आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. मात्र, भाई जगताप यांना अचाणक या पदावरुन हटवल्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. जगताप यांना पदावरुन हटवण्याचे काही कारणं सांगण्यात येत आहेत.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे जगताप यांच्या विषयी पक्षात नाराजी होती. काँग्रेसने भाई जगताप (Bhai Jagtap) आणि चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये हांडोरे हे पहिल्याक्रमांकाचे उमेदवार होते तर भाई जगताप हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते. काँग्रेसचे ४४ आमदार होते. तरी सुद्धा पहिल्या क्रमांकाचे उमेदवार हांडोरे यांचा पराभव झाला. मात्र, जगताप विजयी झाले.

Varsha Gaikwad and 
Bhai Jagtap
Sarkarnama Vishesh : शिंदेंच्या मंत्र्यांवर भाजप आधीच नाराज? अन् सत्तारांचे पुन्हा नवे प्रकरण : स्वत:च बोलून फसले, 'पीए'चा प्रताप...

हांडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसने (Congress) चौकशी समिती नेमली होती. हांडोरे यांचा पराभव म्हणजे पक्षात त्यांच्या विरोधात गटबाजी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दलीत समाजात चुकीचा संदेश गेला होता. यामुळेच भाई जगताप यांची उचलबांगडी झाली. त्यामुळे दलित समजातील आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना संधी मिळाली. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी देखील या पदाची जबाबदारी सांबाळली होती.

तसेच भाई जगताप यांच्या अध्यक्षपदाच्या काळात, मुंबईमध्ये काँग्रेस वाढली नाही, अशीही तक्रार पक्षात होती. तसेच मुंबई काँग्रेसमध्ये नेहमीच गटबाजी राहिली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि भाई जगताप यांच्यामध्ये संघर्ष होता. त्यामुळे पक्षात गटबाजी होती. यामुळेच जगताप यांना हटवल्याचे सांगितले जात आहे.

Varsha Gaikwad and 
Bhai Jagtap
Chandrashekhar Bawankule News : चंद्रशेखर बावनकुळेंनी हलके केले शिंदेंच्या मंत्र्यांचे टेन्शन; मंत्र्यांबाबतच्या निर्णयावर म्हणाले...

हांडोरे यांच्या पराभवसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर काहीच कारवाई केली नाही, असा सूरही उमटत होता. त्यामुळे पक्षात नाराजी पसरली होती. त्यातून जगतापांची गच्छंती झाल्याचे बोलेल जात आहे. मात्र, वर्षा गायकवाड यांच्यासमोरही मोठे आव्हान असणार आहे. मुंबईतील सर्व गटांना एकत्र घेऊन काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे ३० नगरसेवक आहेत, त्यांची संख्या वाढवणे, यासाठी काम करावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com