Eknath shinde Group
Eknath shinde Group Sarkarnama
विशेष

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना महाराष्ट्राबाहेरही धक्का; 8 राज्यातील शिवसेना प्रमुखांचा पाठिंबा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्राबाहेरही (Maharashtra) धक्के देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राबाहेरील तब्बल आठ राज्यातील शिवसेनेच्या प्रमुखांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दर्शवत ठाकरे यांना दणका दिला आहे. त्यामुळे बंडाने अगोदरच घायाळ झालेल्या शिवसेनेला अर्थातच ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा कोंडी केली आहे. (Eknath Shinde group supported by Shiv Sena chiefs from eight states)

एकनाथ शिंदे गटाची नुकतीच मुंबईत एक बैठक झाली, त्या बैठकीला उपस्थित राहून महाराष्ट्राबाहेरील तब्बल आठ राज्यातील प्रमुखांनी आपला पाठिंबा शिंदे यांना दर्शविला आहे. या आठ राज्यामध्ये दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, मणिपूर, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील प्रमुखांनी एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला हजेरी लावत आपण शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या आठ राज्यांतील प्रमुखांनी शिंदे यांना समर्थन दिल्याने उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी केली आहे. निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोणाची, पक्षचिन्ह याबाबत वाद असताना ही घडामोड मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे. राज्यातील बहुतांश शिवसेना आपल्याच पाठिशी हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार रस्सीखेच सुरू असताना आठ राज्यांतील प्रमुखांनी शिंदे यांचे समर्थन करणे, ही मोठी गोष्ट मानली जाते.

मुख्यमंत्री शिंदे गटाकडून शिवेसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा करण्यात आलेला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत, त्यामुळे न्यायालयीन लढाईत एकनाथ शिंदे यांनी आपला दावा भक्कम करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

दुसरीकडे, दसरा मेळावा घेण्याची तयारीही एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्यासाठी आतापर्यंत शिवसेनेचा मेळावा होत घेतलेल्या शिवाजी पार्क मैदानाची मागणीही शिंदे यांच्याकडून करण्यात आली आहे. महापालिका हे मैदान कोणाला देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT