मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘भाऊचा धक्का ते बेलापूर वॉटर टॅक्सी तिकिटाचे दर सर्वसामान्यांना परवडतील, असे ठेवण्यात येतील, तसेच नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ही घोषणा करून अजितदादांनी जुन्या सहकारी आणि भाजपच्या बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांनी केलेल्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. (Finance Minister Ajit Pawar fulfilled two demands of BJP MLA Manda Mhatre)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११ मार्च) विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये पवार यांनी वरील घोषणा केल्या. जलमार्गासाठी ३३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मुंबईच्या आजूबाजूचा भाग जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. दरम्यान, बेलापूर ते मुंबईदरम्यान वॉटर टॅक्सीच्या प्रवासाचे दराबाबत उद्घाटनच्या कार्यक्रमात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून त्याबाबत तक्रारीचा सूर होता. त्यावर अजितदादांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तोडगा काढला आहे. ‘भाऊचा धक्का ते बेलापूर वॉटर टॅक्सीचे दर सर्वसामान्यांना परवडतील, असे केले जातील, असे पवार यांनी अर्थसंकल्पात नमूद केले आहे.
याबरोबरच नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार म्हात्रे यांनी पवारांसमोर केली हेाती. तीही अजितदादांनी मंजूर केली आहे. नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यास मंजुरी देण्याबरोबरच त्यासाठी शंभर कोटींची तरतूदही केली आहे. याशिवाय नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासाठी बेलापूर येथे नवे भवन उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
काय म्हणाल्या होत्या मंदा म्हात्रे?
बेलापूर ते भाऊचा धक्का वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार मंदा म्हात्रे यांनी वॉटर टॅक्सीचे प्रति प्रवासी तब्बल ८०० ते १२०० रुपये भाडे आहे. नवी मुंबईतील मध्यमवर्गीयांना परवडेल अशा निम्या दरात ही जलवाहतूक उपलब्ध करून द्यावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली होती. तसेच, बेलापुरात महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणीही त्यांनी केली होती. महाराष्ट्र भवनासाठी सिडको आपल्याला जागा देणार असल्याची पुष्टी त्यांनी त्यावेळी जोडली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.