Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
विशेष

बंडखोर एकनाथ शिंदेंच्या स्वागताला पोचले भाजपचे बडे पाच आमदार!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तब्बल दहा दिवसांनंतर मुंबईत दाखल झाले आहेत. विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या शिंदे यांच्या स्वागतासाठी भाजपचे तब्बल पाच आमदार दाखल झाले होते. भाजपचे हे पाच आमदार शिंदे यांना घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांसह अर्धा तास चर्चा केल्यानंतर ते भाजप नेत्यांसह राजभवनाकडे रवाना झाले आहेत. (Five BJP MLAs reach Eknath Shinde's reception)

शिवसेना नेतृत्वाविरोधातील यशस्वी बंडानंतर मुंबईत आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची भाजपने मोठी तयारी केली होती. कार्यकर्त्यांसोबतच मोठे नेतेही शिंदे यांना घेण्यासाठी विमानतळावर पोचले होते. त्यामध्ये रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड, पराग आळवणी, मंगलप्रसाद लोढा, अमित साटम अशा पाच आमदारांचा समावेश होता. त्यांनी विमानतळावर शिंदे यांचे स्वागत केले.

शिवसेनेचे मुंबईतील ताकद पाहता एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिंदे यांच्यासाठी मुंबई पोलिसांबरोबरच केंद्र सरकारचे सीआरपीएफचे जवानही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. भाजप नेत्यांसमवेत एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. त्या ठिकाणी त्यांची भाजप नेत्यांसोबत अर्धा तास चर्चा केली. भाजप नेत्यांबरेाब चर्चा झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस हे दोघे राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

विधान परिषदेचे निवडणुकीचे मतदान २० जून रोजी झाले होते. त्यानंतर शिंदे हे आपल्या काही विश्वासू आमदारांसह सूरतला गेले होते. त्यानंतर तब्बल ४० आमदारासंह ते आसाममधील गुवाहाटीमध्ये दाखल झाले होते. शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह तबबल नऊ दिवस राज्याबाहेर होते. भाजपसाठी सत्तेचे दरवाजे उघडे करणारे शिंदे यांच्या स्वागतामध्ये भाजप नेत्यांनी मात्र कुठलीही कुसूर ठेवली नव्हती.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. आपल्याकडे बहुमत असल्याचे पत्र हे दोन्ही नेते राज्यपालांना देणार आहेत, त्यामुळे सत्तास्थापनेला वेग आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT