देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेच १ जुलै रोजी शपथ घेणार

राज्यपालांसोबत हा छोटेखानी कार्यक्रम असणार आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama

मुंबई : नव्या सरकारचा शपथविधी येत्या १ जुलै रोजी होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दोघेच शपथ घेणार आहेत. त्यानंतर ३ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यपालांसोबत हा छोटेखानी कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Devendra Fadnavis and Eknath Shinde will both take oath on July 1)

उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रीपदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पण सुरुवातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच शपथ घेणार आहेत. त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत शपथविधीचा छोटेखानी कार्यक्रम होणार आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
एखादा माणूस ज्यादिवशी..! अखेर राज ठाकरेंनी एका वाक्यातच उद्धव ठाकरेंना केलं घायाळ

दरम्यान, येत्या 2 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी तात्पुरता अध्यक्ष नेमण्यात येणार आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल. त्यापाठोपाठ विश्वासदर्शक प्रस्ताव आणला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ३ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधीचा कार्यक्रम असणार आहे. तोही सोहळा साधेपणाने होईल, असे सांगण्यात आले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
फडणवीसांच्या जागेवर कोण? अजित पवार की जयंत पाटील थोपटणार दंड?

भाजप आणि शिंदे गटामध्ये आज किंवा उद्या खाते वाटपावर चर्चा होणार आहे. पक्षीय पातळीवर खाते वाटप झाल्यानंतर त्यांना शपथ देण्यात येणार आहे. त्यामुळे आज किंवा उद्या खातेवाटपाचे सूत्र ठरेल, असे सांगितले जात आहे. यामध्ये गृह, अर्थ, महसूल व इतर महत्वाच्या खात्याबाबत रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १२ जणांना कॅबिनेट मंत्री पद मिळेल, तर दहाच्या आसपास राज्यमंत्री असतील, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com