Ajit Pawar Sharad Pawar 1 Sarkarnama
विशेष

Maharashtra Political Live Updates : शरद पवार यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रम अजित पवारांनी टाळला; काय आहे कारण...

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Pradeep Pendhare

Baramati Update : शरद पवार यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रम अजित पवारांनी टाळला; काय आहे कारण...

बारामतीमध्ये एआय कार्यशाळा समारोप कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अजून या कार्यक्रमाला पोचले नसल्याचं समोर आलं आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार शेवटचा दिवस आहे. अजित पवार ग्रामीण भागात कारखाना प्रचारासाठी फिरत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला पोचले नसल्याचे सांगितलं जात आहे.

Mithi River Scam : 'ईडी'कडून दिनो मोरियाची तीन तास चौकशी; मिठी पुनरुज्जीवन घोटाळ्याप्रकरणी झाडाझडती

मुंबई (Mumbai) मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय अभिनेता दिनो मोरिया आणि त्याच्या भावाची गुरूवारी तीन तासाची चौकशी केली. या प्रकरणात ईडीने दिनोची दुसऱ्यांना चौकशी केली आहे. दिनो आणि त्याचा भाऊ सँटिनोची ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर झाले. साधारण या दोघांची तीन तास चौकशी झाली. भविष्यात आवश्यकता भासल्यास दोघांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, असे ईडी अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

MNS on Sudhakar Badgujar : भाजप गुन्हेगारांना पोसतोय, बडगुजरांच्या प्रवेशावर मनसेचे जोरदार टीकास्त्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातून हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. या प्रवेशावर विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका होत आहे. नाशिकमधील मनसेच्या नेत्यांनी पोलिस आयुक्त आणि अधीक्षक यांना शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी निवेदन दिले. भाजपकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांना पक्षात प्रवेश दिला जातो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहेत. या गुन्हेगारीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केला आहे.

Sharad Pawar : बारामतीतील PDCC बँक रात्री उघडल्याच्या प्रकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य...

'लोकसभा निवडणूक झाली, त्यावेळी PDCC बँक उघडलेली होती. आज या बँकमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे. बँक उघडण्याविषयी काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बँक कशाला उघडेल. एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा', असं शरद पवार यांनी म्हटले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक (Bank) ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती, असा आरोप करण्यात आला होता. याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्याचा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला आहे.

BJP Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार

जळगावच्या धरणगाव इथल्या क्रांतिवीर खाज्याजी नाईक स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, मंगलप्रभात लोढा उपस्थित असणार आहेत. आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबईत दाखल होणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस लगेचच हा दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Gajanan Kiritkar on Shiv Sena : दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार; गजानन कीर्तिकर यांचं मोठं विधान

Gajanan Kiritkar

दोन्ही शिवसेना (Shivsena) एकत्र आल्या पाहिजे. विभाजनामुळे फार मोठे नुकसान पक्षाचे झालं आहे. दोन दोन वर्धापन दिवस साजरे होतात, दोन दसरा मिळावे साजरे होताय. ही सगळी दोन ठिकाणची ताकद एकत्र आली तर केवढी मोठी ताकद शिवसेनेची महाराष्ट्रात दिसेल. दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेल, असे मोठं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे.

BJP Vs Congress : केंद्रातील मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीवर काँग्रेसची जोरदार टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर यांना भोजनासाठी आमंत्रित केल्यानंतर काँग्रेसने केंद्रातील मोदी (Narendra Modi) सरकारवर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी मुनीर यांना भोजनासाठी आमंत्रित करणे हा भारतीय मुत्सद्देगिरीसाठी मोठा धक्का असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी केली.

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर; उपचारानंतर रुग्णालयातून घरी

काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना सर गंगा राम रुग्णालयातून घरी सोडण्यात आहे. चार दिवसांपूर्वी त्यांना पोटासंबंधी त्रास सुरू झाला होता. पोटामध्ये संसर्ग झाल्याने 78 वर्षीय सोनिया गांधी यांना 15 जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Siddhant Shirsat Case : मंत्री शिरसाट यांचा पुत्र सिद्धांत यांचे 'वेदांत'च्या लिलावातून माघारीचे पत्र नाही

Siddhant Shirsat

छत्रपती संभाजीनगर वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या लिलावावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप झाले. यानंतर वेदांत हॉटेल विकत घेतल्याच्या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी जाहीर केले होते. मात्र, पालकमंत्र्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी यासंदर्भात अद्याप प्रशासनाला पत्र दिलेले नाही. दरम्यान, लिलावात निश्चित झालेल्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम भरण्याची मुदत आज (20 जून) सायंकाळीपर्यंत आहे, असे असताना अद्याप कंपनीने पैसे भरले नसल्याची माहिती समोर आली आहे.

Jammu Kashmir News : 'जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणे हा घटनात्मक अधिकार'

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळवणे ही कोणतीही सवलत नसून, तो घटनात्मक अधिकार आहे, नॅशनल काॅन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Girish Mahajan BJP : भाजपमधील नाराजांवर काळ हाच उपाय; मंत्री गिरीश महाजन

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपमध्ये (BJP) इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे भाजपमधील मूळ आणि जुने-जाणते पदाधिकारी नाराज झाले आहेत. या नाराजीवर काळ हाच उपाय असल्याची प्रतिक्रिया भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT