Hitendra Thakur  Sarkarnama
विशेष

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत हितेंद्र ठाकूरांचे मोठे वक्तव्य!

कोणाला पैसे दिले, हे एकदा जाहीर करा. ज्यांनी पैसे घेतले, त्यांना येऊ लोकांसमोर येऊ द्या.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council elections) कोण फुटलं?, हे निकालानंतरच कळेल. जो हरला, तो खापर फोडणारच. आमदार म्हणजे काय मच्छीमार्केट आहे का? कोणाला पैसे दिले, हे एकदा जाहीर करा. ज्यांनी पैसे घेतले, त्यांना येऊ लोकांसमोर येऊ द्या. वायफळ बडबड करणं, हे काही खरं नाही, असे वक्तव्य बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केले. (Hitendra Thakur's big statement on the results of the Legislative Council elections)

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर आमदार हितेंद्र ठाकूर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सर्वपक्षातील लोकांशी आमचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे सर्वजण मला मानतात. माझ्यावर सगळे विश्वास दाखवतात. या सगळ्या पक्षांचा मी आभारी आहे. निकाल लागल्यावर कळेल की, कोण फुटला आहे ते. जो हरतो, तो दुसऱ्यावर खापर फोडतो, असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.

आमदार म्हणजे काय मच्छीबाजार आहे. संजय राऊत यांनी आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेला नाही. फक्त आमची मतं मिळाली नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी माझ्यावर आरोप केलेला नव्हता, असेही हितेंद्र ठाकूर म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना गद्दारीबाबत भाष्य केले हेाते. त्याबाबत ठाकूर म्हणाले की, गद्दार कोण आहे, आपल्या आईचं दूध विकू नये वैगेरे ते बोलले आहेत. त्यांनी काही चुकीचं बोलले नाहीत.

छोटे मोठे पक्ष असतात. मोठ्या पक्षांकडे मतं असतात, आम्हाला स्वतःच्या हिम्मतीवर निवडून यावं लागतं. कोणत्याही निवडणुकांमध्ये कोणी आपलं दुकान बंद करत नाही, तेव्हा आणले जातात एन्काऊंटर स्पेशालिस्ट वैगेरे. मी कोणत्याही पक्षावर नाराज नाही. लोकशाहीत प्रत्येकाला हक्क आहे, राजकारणात हे सर्व चालत असतं, असेही हितेंद्र ठाकूर म्हणाले.

क्षितिज ठाकूर हे आमच्या कुटुंबातील एका सदस्याच्या उपचारासाठी गेले होते. पण, आमच्या राजकीय मित्रांनी आम्हाला येण्याची फारच गळ घातली. लोकशाही टिकवली पाहिजे; म्हणून क्षितिज ठाकूर हे थेट परदेशातून विमानतळावर उतरले आणि तिकडून विधान भवनात पोचले आहेत, असे असे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT