Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
विशेष

‘मी शिवसेनेशी गद्दारी केली नाही; उलट पक्षानेच माझ्याबरोबर गद्दारी केली’

सुदाम बिडकर

पारगाव (जि. पुणे) : शिवसेना (Shivsena) पक्षाबरोबर गेली १८ वर्ष प्रामाणिक राहूनसुध्दा माझी पक्षातून हकालपट्टी केली. काही तासांतच हकालपट्टी मागे घेत माझा घरचा शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघ सोडून पुणे शहर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करा, असे सांगून पक्षाने माझ्यासह सर्वसामान्य शिवसैनिकांवर एक प्रकारे अन्याय केला आहे, त्यामुळे मी गद्दारी केली नसून पक्षानेच उलट माझ्याबरोबर गद्दारी केली आहे, अशा शब्दांत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (I did not betray Shiv Sena : Shivajirao Adhalrao Patil)

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (ता. १२ ऑगस्ट) आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात गावभेट दौऱ्याचा प्रारंभ अवसरी बुद्रूक येथून केला. त्यावेळी ते बोलत होते. आढळराव पाटील यांनी या दौऱ्यात प्रत्येक गावांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

आढळराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेचे प्राबल्य असणाऱ्या गावांवर विकास निधीच्या बाबत अन्याय झाला आहे, त्याला माझे लांडेवाडी गावसुध्दा अपवाद नाही. सर्वसामान्य शिवसैनिकांवर अन्याय होत होता, त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यापुढे मला खासदारकी किंवा इतर कोणतेही पद महत्वाचे नसून माझ्या शिवसैनिकांची कामे मार्गी लागली पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे.

प्रास्ताविक करताना कल्याण हिंगे यांनी अवसरी बुद्रुक गाव आणि परिसरातील सर्व शिवसैनिक सदैव आढळराव पाटील यांच्या बरोबर असणार असल्याची ग्वाही दिली. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, तालुका प्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सचिन बांगर, शिवाजी राजगुरू, प्रवीण थोरात, वैभव पोखरकर, स्वप्नील हिंगे, मनीषा फल्ले, मच्छिंद्र टाव्हरे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT