Ravi Rana : Bachu Kadu
Ravi Rana : Bachu Kadu Sarkarnama
विशेष

रवी राणांसोबत चर्चा करण्याची माझी इच्छा नाही : बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘‘आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासोबत एकत्र चर्चेला बसण्याची माझी इच्छा नाही. पन्नास खोक्यांच्या आरोपाप्रकरणी आमदार रवी राणा यांनी योग्य उत्तर द्यावे; अन्यथा माघार नाही,’’ असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे. (I don't want to discuss with Ravi Rana : Bachu Kadu)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावले आहेत, त्यामुळे मी त्यांची भेटणार आहे, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. आमदार रवी राणा हे मुंबईत पोचले आहेत. मात्र, बच्चू कडू अद्याप अमरावतीमध्येच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी अमरावतीहून निघण्यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आज मिटण्याची शक्यता आहे. कारण या दोघांनाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी बोलावले आहे. राणा हे मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, बच्चू कडू अमरावतीमध्ये आहेत, त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली

माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, मी तीन वाजताच्या फ्लाईटने निघणार आहे. संध्याकाळपर्यंत मी मुंबईत पोहोचणार आहे. रवी राणा यांच्याकडून माझी बदनामी झाली आहे. त्यामुळे उत्तर व्यवस्थित आलं आणि सर्व कार्यकर्त्यांचं समाधान झालं तरच तोडगा निघेल. नाहीतर तोडगा निघणार नाही. राणा यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, ते किती खरे आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आमदार रवी राणा हे खोटं आणि चुकीचे बालेले आहेत. त्यावर त्यांनी व्यवस्थित उत्तर द्यावं, एवढीच माझी मागणी आहे.

मला पाठिंबा देणाऱ्यांचं मी आभार मानतो. एखादा लोकप्रतिनिधी उभा राहायला त्याचं आयुष्य जातं. त्यात जरं अशा पद्धतीची व्यक्तव्य करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याचा सर्वांनीच निषेध केला आहे. बऱ्याच लोकांंचं फोन आले, त्यांनी ठाम उभं राहण्याची सूचना केली. भाषेसंदर्भात आचारसंहिता करण्याची सूचना सुप्रिया सुळे यांनी केली आहे, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

रवी राणांच्या उत्तरावर एक तारखेच्या आमच्या पक्षाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. ते कसं येतंय हे पाहावे लागणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत एकत्र बैठकीला बसण्याची माझी इच्छा नाही. पण मुख्यमंत्री काय म्हणतात ते बघू, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT