कोल्हापुरात ऊसदर आंदोलन चिघळले : शिरोळ बंद पुकारणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

गेल्या वर्षी उसाची ७०-३० फॉर्म्युलानुसार जादा रक्कम देण्याची मागणी करत या वर्षीच्या उसाला तीन हजार पन्नासपेक्षा अधिक दर देण्याची मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे.
Sugarcane Price Agitation
Sugarcane Price AgitationSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात ऊसदर (Sugarcane FRP) आंदोलन चिघळले आहे. पोलिसांनी (police) आंदोलन अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईनंतर आंदोलक आणि कारखान्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे ऊस दराच्या मागणीसाठी आज आंदोलन अंकुशच्या वतीने शिरोळ (Shirol) तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, उसाची वाहने अडविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबदस्तीने ताब्यात घेतले आहे, त्यामुळे आंदोलन चिघळले आहे. पोलिस प्रशासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. (Sugarcane price agitation rages in Kolhapur : Activists calling for Shirol bandh were detained by police)

यावेळी शिरोळसह आजूबाजूच्या गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उसाची दरनिश्चिती केल्याशिवाय उसाची वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेने दिला होता. तरीही ऊस वाहतूक सुरू राहिल्याने सुरू राहिल्याने आंदोलन अंकुश ही संघटना आक्रमक झाली आणि आजचा बंद पुकारला आहे.

Sugarcane Price Agitation
सोलापूर शिवसेनेतील पडझड थांबेना : अक्कलकोट तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांसह आणखी १५ जणांचे राजीनामे

दरम्यान, गेल्या वर्षी उसाची ७०-३० फॉर्म्युलानुसार जादा रक्कम देण्याची मागणी करत या वर्षीच्या उसाला तीन हजार पन्नासपेक्षा अधिक दर देण्याची मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे.

Sugarcane Price Agitation
‘अब्दुल सत्तार जिथे जातात तिथे गमती करतात; ते कृषीमंत्री नसून स्वखुशीमंत्री’

उसदाराचे आंदोलन शांततेने आणि सदनशीर मार्गाने गेली चार पाच दिवसांपासून चालू होते. आमची मागणी एवढीच आहे की मागच्या वर्षीचं काहीतरी द्या. पण या वर्षी किमान ३००० च्या पुढे भाव द्यावा. पण, कारखानदारांची भूमिका आम्हाला कुठेही विश्वासात न घेता आम्ही म्हणतो तेवढाच भाव घ्यायचा. शेतकऱ्यांना जबरदस्तीने टोळी घ्यायला लावून कारखाना चालू आहे, असा दाखविण्याच प्रयत्न कारखानादारांकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या जिवावर ह्यांची कारखानादारी चालते. पोलिसांच्या मदतीने त्यांनी जो आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा उलटा परिणाम या कारखानदारांना भोगावा लागणार आहे, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Sugarcane Price Agitation
इंदापुरातून विजयाचा ढोल कोणाचा वाजणार...हर्षवर्धन पाटील, दत्तात्रेय भरणे की प्रवीण माने?

ते म्हणाले की, आज शिरोळ तालुक्यातील सर्व गावांत कडकटीत बंद पाळण्यात येत आहे. शेतकरी कारखानादारांच्या विरोधात भूमिका घेत नसले तरी पण आजच्या बंदच्या माध्यमातून कारखानदारांना मेसेज दिला आहे. कारखानदारांनी परीक्षा न पाहता आता चर्चेला तरी यावे किंवा स्वतःहून ऊसाचा दर जाहीर करावा.

पंढरपुरात आंदोलनला हिंसक वळण

दरम्यान, ऊसदराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ऊस दर संघर्ष समितीने साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला तालुक्यात हिंसक वळण लागले होते. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेवून जाणाऱ्या चार ट्रॅक्टरचे अज्ञांनी धारदार शस्त्राने टायर फोडले. यामध्ये वाहनमालकांचे सुमारे अडीच लाख रुपये नुकसान झाले आहे.

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर्षीच्या हंगामात गाळप होणार्या ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येत ऊस दर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या वतीने आंदोलन हे पुकारले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com