Sharad Pawar-Jayant Patil Sarkarnama
विशेष

Sharad Pawar Announced Retirement: तुम्ही थांबणार असाल, तर आम्ही सर्वजण राजीनामे देतो : जयंत पाटलांनी रडतच केली मागणी

Jayant Patil On Sharad Pawar Retirement: तुम्ही आम्हा सर्वांचे राजीनामे घ्या. तुम्हाला पक्ष नव्या लोकांच्या हातात द्यायचा आहे, तर तो द्यावा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आम्ही पवारसाहेबांच्या (Sharad Pawar) नावानं मतं मागतो, त्यांच्या नावाने पक्षाला मतं मागतात. तेच बाजूला गेले तर आम्ही कोणाला घेऊन लोकांसमोर जायचे. देशातील लोकांसाठी ते पक्षाचे अध्यक्ष असणे गरजेचे आहे. त्यांनी असा निर्णय घेणे, देशातील कोणत्याही व्यक्तीला मान्य नसेल. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रडतच केली. (If you are going to stay, we all resign from the party : Jayant Patil)

लोक माझे सांगाती भाग दोन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सभागृह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतले आहे. पवारसाहेब जोपर्यंत निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका नेते, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला हवा आहे. आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे पाहूनच राजकारण करत आलो आहोत. त्यांची स्फूर्ती घेऊन राजकारणात वावरतो. राजकारण करत आलो आहे. त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याचा उल्लेख केला होता. पवारसाहेब आम्ही तुम्हाला सर्व अधिकार देतो. पण, देशाच्या सवोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा ती दुसरी कोणाला येणार नाही.

तुम्ही आम्हा सर्वांचे राजीनामे घ्या. तुम्हाला पक्ष नव्या लोकांच्या हातात द्यायचा आहे, तर तो द्यावा. पण पक्षाच्या प्रमुखपदावरून बाजूला जाणं, हे कोणच्याही हिताचे नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सर्वजण थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचा आहे, त्यांना चालवू द्या, अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली. पवारसाहेबांना परस्पर निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. तो देशातील कोणालाही मान्य नसेल. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मी विनंती करतो, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT