Budget 2025 Announcement Sarkarnama
विशेष

Income Tax Rule : ...तर 12 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असूनही भरावा लागणार 'Income Tax'!

Union Budget 2025 on Income Tax Rule : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

Mayur Ratnaparkhe

Budget and New Income Tax Rule : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रांसाठी भरघोस निधी जाहीर केला गेला. परंतु या अर्थसंकल्पातील सर्वात चर्चेची गोष्टी ठरली तरी नोकरदार वर्गासाठी 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा. नव्या नियमानुसार 1 एप्रिल 2025पासून 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणत्याही प्रकराचा आयकर भरावा लागणार नाही. यामुळे सर्वासामान्य नोकरदार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

मात्र असे असले तरी काही प्रकरणांमध्ये तुमचे उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षाही कमी असले तरी तुम्हाला आयकर भरावा लागू शकतो. यामध्ये काही विशिष्ट पद्धतीने मिळणाऱ्या उत्पन्नांचा समावेश केला गेला आहे. कारण, या प्रकरणात सेक्शन 87A अंतर्गत मिळणाऱ्या सूट मुळे कर दायित्व शून्य होणार नाही. अर्थसंकल्पात हे स्पष्ट करण्यात आले आहे की काही विशिष्ट प्रकरणांमधून मिळणाऱ्या उत्पन्नास सेक्शन 87A अंतर्गत आयकरातून(Income Tax) सूट मिळणार नाही.

सरकारने सेक्शन 111A (शॉर्ट टर्म कॅपिटल्स गेन्स), सेक्शन 112 (लाँग टर्म कॅपिटल गेनस) यामुळे मिळणाऱ्या उत्पनास सेक्शन 87Aचे अतंर्गत मिळणाऱ्या सूट पासून वेगळे ठेवले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा झाला की, जर तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे, ज्यामध्ये तुमचे वेतन 8 लाख रुपये आणि 4 लाख रुपये कॅपिटल गेन(जसं की शेअर बाजार किंवा मालमत्तेमधून नफा) मिळाले आहे. तर सेक्शन 87A अंतर्गत करातून सूट केवळ 8 लाखांवरच मिळेल. म्हणजेच 4 लाख रुपयांच्या कॅपिटल गेनवर तुम्हाला वेगळा आयकर द्यावा लागेल.

नवीन कररचनेनुसार आठ लाख ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के टॅक्स आहे. अशाप्रकारे आर्थिकवर्ष 2026मध्ये तुमच्या आठ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सेक्शन 87Aच्या सूटसह कोणताही कर लागणार नाही. परंतु बाकी चार लाख रुपयांवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन(शेअर बाजारातून होणारा नफा)च्या हिशोबाने कररचनेच्या हिशोबाने 10 टक्के आयकर लागेल. जो 40हजार रुपये होतो.

तर पुढील आठवड्यात इन्कम टॅक्स बील पुढील संसदेत मांडलं जाणार आहे. यासह कस्टम ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली जाणार असून कॅन्सरवरील औषधं कस्टम ड्युटीतून वगळण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT