Defense Budget 2025: केंद्र सरकारने वाढवले 'संरक्षण बजेट'; 6,81,210 कोटी रुपयांची तरतूद

Nirmala Sitharaman on Defense Budget 2025 : नौदलासाठी 24,390 कोटींची तरतूद केली गेली आहे. इतर उपकरणांसाठी 63,099 कोटी रुपये बाजूला ठेवण्यात आले आहेत.
Defense Budget 2025
Defense Budget 2025Sarkarnama
Published on
Updated on

Union Budget 2025 : केंद्र सरकारने संरक्षण बजेटसाठी तब्बल 6,81,210 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या 6,21,940 कोटी रुपयांच्या खर्चापेक्षा अधिक आहे. तेच एकूण भांडवली खर्च1,92,387 कोटी रुपये इतका अंदाजित आहे.

महसूल खर्च 4,88,822 कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. पेन्शनसाठी 1,60,795 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भांडवली खर्चाअंतर्गत विमान आणि विमान इंजिनासाठी 48,614 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे.

Defense Budget 2025
Union Budget 2025 : विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत बिहारसाठी घोषणांचा पाऊस; नितीशकुमारांना खूष करत मतांसाठी पेरणी

याशिवाय नौदलाच्या ताफ्यासाठी 24,390 कोटींची तरतूद केली गेली आहे. इतर उपकरणांसाठी 63,099 कोटी रुपये बाजूला ठेवण्यात आले आहेत. 2024-25 मध्ये सरकारने संरक्षण अर्थसंकल्पासाठी 6,21,940 कोटी रुपये वाटप केले होते. यामध्ये भांडवली खर्च 1,72,000 कोटी रुपये इंतका अंदाजित होता.

तर, न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर रीसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी भारतीय बनावटीच्या छोट्या मॉड्युलर रिअक्टर्ससाठी, असा प्रकारची सुविधा उभारली जाणार आहे. त्यासाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट उर्जा उत्पादनाचं लक्ष्य असल्याचे निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी सांगितले.

Defense Budget 2025
Union Budget 2025 : मोदी सरकारसाठी महिला 'लाडक्या', बजेटमध्ये दिलं मोठं गिफ्ट!

तर पतंप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी ''आजचे बजेट सर्व भारतीयांची स्वप्न पूर्ण करणारे ठरेल. हे बजेट जनता जनार्दनचे होते. आजच्या बजेटमुळे बचत होईल आणि उत्पन्न वाढणार आहे.आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारे बजेट आहे. देशाच्या प्रगतीला बळ मिळणार आहे. नव्या कररचनेमुळे नोकदारांना फायदा होणार आहे. यामुळे मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो.'', अशी प्रतिक्रिया दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com