Union Minister Murlidhar Mohol relieved after cancellation of Pune’s Jain Boarding land deal following Gokhale Builders’ withdrawal Sarkarnama
विशेष

Jain Boarding Hostel : हुश्शsss सुटलो बाबा एकदाचा...! मुरलीधर मोहोळांना 15 दिवसांनंतर शांत झोप लागणार

Jain Boarding Hostel : पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार धर्मादाय आयुक्तांनी रद्द केला असून गोखले बिल्डर्स मागे सरले आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाचा खुलासा केला.

Sudesh Mitkar

Pune News : अखेर पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचा व्यवहार रद्द झाला आहे. गोखले बिल्डर्सकडून व्यवहार रद्द करण्याची तयारी दाखवण्यात आल्यानंतर धर्मादाय आयुक्त यांनीही व्यवहार रद्द करण्यात आल्याचा निकाल दिला. हा व्यवहार रद्द होताच या प्रकरणात आरोप झालेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा केला, यावेळी मोहोळ यांच्या चेहऱ्यावर सुटलो बाबा एकदाचा असे भाव स्पष्टपणे दिसत होते.

पुण्यातील शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंग होस्टेल जागेच्या व्यवहारावरून गेले काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलं होतं. जैन बोर्डिंगची कोट्यावधींची जागा गोखले बिल्डर्सने हडपली असल्याचा आरोप झाला होता. अशात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे गोखले बिल्डर्सचे यापूर्वीचे पार्टनर होते. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात ओढण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी यात उडी घेऊन मोहोळ यांच्यावर आरोप केले होते.

मुरलीधर मोहोळ यांचे गोखले बिल्डर्सचे पूर्वाश्रमीचे पार्टनर आणि सध्याचे मित्र असल्याने त्यांच्या पाठिंब्यानुसारच हा सगळा जमिनीचा व्यवहार झाला असल्याचा आरोप झाला होता. जैन हॉस्टेल बोर्डिंगची जागा ट्रस्टी आणि बिल्डर यांनी संगनमताने लाटली असल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी महिन्यापूर्वी आंदोलन केलं होतं. शेट्टींनी या सर्व व्यवहारांमध्ये खासदार मोहोळ यांचा संबंध जोडला होता. त्यानंतर या प्रकरणांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी मैदानातून उतरत टीकेची राळ उठवली.

यामुळे अडचणीत आलेल्या मोहोळ यांनी वारंवार याबाबत खुलासा केला. पण त्यांच्यावर आरोपांची मालिका थांबली नव्हती. अखेर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी या प्रकरणातच मुरलीधर मोहोळ यांना भेटायला बोलावलं असल्याचा देखील चर्चा झाल्या. फडणवीस यांच्या भेटीनंतर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली आणि एक ऑक्टोबरपूर्वी हा सगळा व्यवहार रद्द करण्यात येईल असा शब्द दिला.

त्यानंतर काही तासांतच चक्र फिरली आणि बिल्डर विशाल गोखले यांनी आपण या व्यवहारातून बाहेर पडत असल्याचा मेल ट्रस्टींना केला. या दरम्यान, धर्मादाय आयुक्तांनी या सर्व व्यवहाराला स्थगिती दिली होती. तसेच या व्यवहाराशी संबंधित सर्व बँक खाती, व्यवहाराचे 230 कोटी रुपये गोठवण्याचे आदेश दिले होते. अखेर आज (30 ऑक्टोबर) रोजी झालेल्या सुनावणीमध्ये धर्मादाय आयुक्तांनी व्यवहार रद्द केल्याची घोषणा केली.

या स्थगितीनंतर मुली तर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोहोळ म्हणाले, धर्मादाय आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय त्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिला होता, मी स्वतः जैनमुनीची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगितलं होतं. त्यानंतर हा निर्णय होत असल्याने आनंद होत आहे. या जमीन व्यवहाराबाबत जैन समाजाची जी जनभावना त्या जनभावनेचा आदर करत त्यावेळी आम्ही शब्द दिला होता.

बिल्डरने आणि ट्रस्टीने धर्मादाय आयुक्तांना पत्र दिले आणि हा व्यवहार रद्द झाला. या दरम्यान काही राजकीय व्यक्तींनी माझ्यावरती आरोप केले, मात्र जैन समाजाने माझ्यावरती कधी आरोप केले नाही. जे राजकीय आरोप झाले त्यांना मी योग्य वेळी उत्तर देणार आहे. जैन मुनींना जे अपेक्षित होते ते झालं आहे. माझं काही नसताना काही लोकांनी या प्रकरणाशी माझा संबंध जोडला. हे वेदनादायी होतं .बाकीच्या लोकांनी स्वार्थ साधून घेतला असं म्हणत नाव न घेता मोहोळ यांनी धंगेकारांवरती टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT