Jitendra Awhad  Sarkarnama
विशेष

Jitendra Awhad New : जितेंद्र आव्हाडांचा वाढदिनी मोठा निर्णय; म्हणाले, ‘मी अस्वस्थ आहे...’

NCP Leader : लोक किती स्वार्थी असतात, हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिनी मोठा निर्णय घेतला आहे. देशात होणारी लोकशाहीची गळचेपी, महाराष्ट्रातील पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. यामुळे अत्यंत अस्वस्थ आहे, त्यामुळे मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही, तसेच कोणालाही भेटणार नाही, असे जाहीर केले आहे. (Jitendra Awhad's big decision on his birthday; Said, 'I'm restless...')

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांचा आज (ता. ५ ऑगस्ट) वाढदिवस आहे. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थिती, मणिपूरमधील हिंसाचार, लोकशाहीची होणारी हत्या, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) फूट आणि राजकारणाची घासरलेली पातळी यामुळे आव्हाड यांनी आपला वाढदिवसही (Birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते कोणालाही भेटणार नाहीत.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ही मााहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पाच ऑगस्ट... माझा वाढदिवस. लोक मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. आपल्या भावना मनापासून व्यक्त करतात. ते सर्व मनापासून हृदयस्पर्शी असतं. पाच तारखेला वर्षभराची ताकत मिळते. पण मला माफ करा. ह्या पाच तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.

देशात होत असलेली लोकशाहीची हत्या, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं, असे मला वाटत नाही.

तुमच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद आहेत, हीच माझी खरी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे, तरीही मला माफ करा. मी शुक्रवारी रात्री बारापासून ते शनिवारी रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.

लोक किती स्वार्थी असतात, हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT