Hasan Mushrif Samarjeet Ghatge
Hasan Mushrif Samarjeet Ghatge sarkarnama
विशेष

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफ-घाटगेंची गट्टी जनतेला पचली का? मंडलिकांचा निकाला ठरवणार भवितव्या...

Rahul Gadkar

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात लढत झाली. मात्र, या लढतीमुळे जी राजकीय समीकरणे उदयास आली त्यामुळे मतदारसंघानिहा परिस्थिती बदलली. राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघ यंदा मात्र चांगलाच चर्चेचा विषय राहिला.

नेहमीच एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे हे खासदार संजय मंडलिक यांच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले.

वास्तविक विधानसभा निवडणुकीत एकमेकांना अंगावर घेऊन राजकारण करणाऱ्या या जोडीला एकत्र आल्याचे पाहताच अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. शिवाय कार्यकर्त्यांना देखील हे पटले आहे की नाही, हे निवडणुकीच्या निकालावरच अवलंबून आहे. या दोन्ही नेत्यांची परीक्षा उद्याच्या लोकसभा निकालावर आहे.

कागल विधानसभा मतदारसंघात सध्या महायुतीचे पारडे जड आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif , भाजप नेते समरजीत घाटगे, खासदार संजय मंडलिक याच भूमितील आहेत. शिवाय महाविकास आघाडीकडे माजी आमदार संजय घाटगे, माजी स्थायी समिती सभापती अंबरीश घाटगे हे दोन चेहरे आहेत.

वास्तविक पाहता महायुती या मतदारसंघात प्रबळ आहे. या मतदारसंघावरच खासदार संजय मंडलिक यांचा विजय अवलंबून आहेत. मात्र गेल्या दहा वर्षांपासून एकमेंकांना पाण्यात पाहणाऱ्या मुश्रीफ आणि घाटगे Samarjeet Ghatge यांची युती जनतेला पचली आहे का? हे उद्याच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

पालकमंत्री आसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. खासदार मंडलिक यांच्या विजयासाठी हाडाची काड आणि रक्ताचे पाणी करू, असे सातत्याने मुश्रीफ यांनी विधाने केली आहेत. तर समरजीत घाटगे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विकासकामाची माहिती देत युतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले होते.

मात्र वास्तविक पाहता या दोन्ही मुश्रीफ-घाटगे यांचे राजकीय वैर पाहता तळागाळातील कार्यकर्ते यांच्यासोबत खरंच राहिले का? हे उद्याच्या निकालात स्पष्ट होणार आहे. कागल हे नेहमी पुरोगामी विचारांना मानणारा तालुका आहे. पालकमंत्री मुश्रीफ सतत्याने पुरोगामी विचार जपला आहे. मात्र यंदाची निवडणूक विचारांची निवडणूक म्हणून पहिली जाते.

मुश्रीफ यांनी उजव्या विचारसरणीला पाठिंबा दिल्याने जनता त्यांच्यासोबत किती आहे. हे देखील उद्याच्या निकालात स्पष्ट होणार आहे. खासदार संजय मंडलिक यांचा विजय झाल्यास श्रेय घेण्यात आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेय घेण्यासाठी चढाओढ असणार आहे. शिवाय पराजय झाल्यास किंवा मताधिक्य कमी झाल्यास आरोप प्रत्यारोपांचा खेळ पाहयाला मिळणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT