Kolhapur Lok Sabha 2024: काउंटडाऊन सुरू...; कार्यकर्त्यांची घालमेल अन् उमेदवारांचे देव पाण्यात

Lok Sabha Election 2024 Kolhapur Political Party Workers in Tension ahead of Counting of Votes: कोल्हापूर लोकसभासाठी रमणमळा तर हातकणंगले लोकसभासाठी राजाराम तलाव येथे मतमोजणी होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.
Kolhapur Lok Sabha 2024
Kolhapur Lok Sabha 2024Sarkarnama

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (Kolhapur Lok Sabha 2024) आणि हातकणंगले लोकसभेसाठीचा निकाल उद्या (मंगळवार) स्पष्ट होणार आहे. विशेषत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty), शिवसेना शिंदे गटाचे दोन विद्यमान खासदार मतदार संघात आपले नशीब आजमावत आहेत.

अशातच प्रशासनाकडून आणि जिल्हा पोलिस प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.कोल्हापूर लोकसभासाठी रमणमळा तर हातकणंगले लोकसभासाठी राजाराम तलाव येथे मतमोजणी होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून जवळपास 17 उमेदवार रिंगणात होते. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज विरुद्ध महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक अशी दुरंगी लढत झाली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जवळपास 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी चौरंगी लढत या मतदारसंघात. महाविकास आघाडी कडून सत्यजित पाटील, महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डी.सी. पाटील यांच्यात लढत झाली आहे. दोन्ही मतदारसंघातील जवळपास 45 उमेदवार आमचे भवितव्य उद्या ठरणार आहे.

टपाली मतमोजणीला सुरवात

सकाळी आठ वाजल्यानंतर या दोन्ही ठिकाणी टपाली मतदान आणण्यात येईल. दहा वाजेपर्यंत संपूर्ण टपाली मतमोजणी करून टपाली मतदानाचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर विधानसभा निहाय सकाळी दहा नंतर मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या आणि मतदानयंत्रातील मते यांची मोजणी केली जाणार आहे. संध्याकाळी सातपर्यंत अंतिम निकाल हाती येईल, असा अंदाज आहे.

Kolhapur Lok Sabha 2024
Lok Sabha Elections 2024: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर? काँग्रेस अँक्शन मोडमध्ये

कोल्हापूर मतदारसंघात या निवडणुकीत मतदानाची यंदा टक्केवारी वाढली आहे. या मतदारसंघात एकूण मतदार १९ लाख ३६ हजार ४०३ इतके आहेत. १३ लाख ८६ हजार २३० इतके मतदान झाले असून सरासरी ७१.५९ % इतके मतदान झाले आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे सरासरी ७१.११ इतकी मतदानाची टक्केवारी आहे. एकूण मतदार १८ लाख १४ हजार २७७ असून १२ लाख ९० हजार ७३ इतके मतदान झाले आहे. मतमोजणीसाठी दोन्ही मतदारसंघासाठी 686 इतके के कर्मचारी तैनात केले असून बाराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Kolhapur Lok Sabha 2024
Arun Gawli: 'डॅडी'ला रोखण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार अलर्ट ; सुटकेनंतर गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या?

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी यंदाच प्रचंड चुरशीने मतदान झाले आहे. विद्यमान खासदारांनी शिवसेना ठाकरेंची साथ सोडल्यानंतर जनतेत असणारी नाराजी, निष्ठावंत शिवसैनिकाला हातकणंगलेतून मिळालेली उमेदवारी यामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेससाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सर्वच एक्झिट पोलनुसार कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा आघाडीवर दिसत असताना कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे. मात्र प्रत्यक्ष निकालावरच काही कार्यकर्ते अवलंबून असून यांनी देखील आतापासूनच आपले देव पाण्यात घातले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com