Devendra Fadnavis-Lalit Patil  Sarkarnama
विशेष

Lalit Patil Drugs Case : ललित पाटील प्रकरणी फडणवीसांचा गर्भित इशारा; ‘अजून खूप गोष्टी आहेत, त्या आजच सांगणार नाही’

Devendra Fadnavis PC News : तेव्हा ललित पाटील याचे इन्ट्रोडक्शन का केलं नाही. त्याला तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री जबाबदार होते का?

Vijaykumar Dudhale

Mumbai News : ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणात अजून खूप गोष्टी आहेत. पण आज त्या सांगणार नाही, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे ललित पाटील प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. (Lalit Patil case 'There are many more things, don't tell them today': Devendra Fadnavis)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २० ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर ड्रगमाफिया ललित पाटील याच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी उत्तर देत या प्रकरणाचे गूढ वाढविले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस म्हणाले की, ललित पाटील याला १०-११ डिसेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. जेव्हा ललित पाटील याला अटक झाली, तेव्हा तो नाशिकचा शिवसेनेचा प्रमुख होता. अटकेनंतर त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. पोलिस कोठडी मिळाल्यानंतर तो पुण्याच्या ससून रुग्णलयामध्ये ॲडमिट झाला. तो १४ दिवस ससून रुग्णालयात होता.

ललित पाटील याच्या आजारपणाबाबत त्यावेळी सरकारी पक्षातर्फे न्यायालयात अर्जही देण्यात आलेला नव्हता. पोलिसांकडून काहीच केले गेले नाही, तर पोलिस कोठडी १४ दिवसच मिळते. आम्ही या प्रकरणाची चौकशी करतो आहोत. मात्र, या प्रकरणात गुन्हेगाराचे इन्ट्रोडक्शनच (ओळख परेड) झाले नव्हते. ललित पाटील याच्या विरोधात केस स्टॅंड करायची झाली, तर पोलिसांनी आता काय स्टॅंड घ्यायचा,असा सवाल फडणवीस यांनी केला.

आता माझा सवाल आहे की, तेव्हा ललित पाटील याचे इन्ट्रोडक्शन का केलं नाही. त्याला तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री जबाबदार होते का? कोणाच्या दबावातून हे सगळं झालं. पोलिसांवर कोणाचा दबाव होता. ललित पाटील यांचे कोणाशी संबंध होते. या प्रकरणात अजून खूप गोष्टी आहेत, त्या आज सांगणार नाही. आता तुम्हीच ठरवा नार्को टेस्ट कुणाची झाली पाहिजे, असा बॉम्बही फडणवीसांनी ललित पाटील प्रकरणात टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT