NCP Sarkarnama
विशेष

इतर पक्षातील नेते संपर्कात; लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार : जयंतरावांचा गौप्यस्फोट

जत तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

जत (जि. सांगली) : जत तालुक्यातील इतर पक्षातील अनेकजण आपल्या संपर्कात आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करू इच्छित आहेत, लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश केला जाईल, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी पुन्हा केले. भाजपच्या विलासराव जगताप (Vilasrao Jagtap) यांनी काही दिवसांपूर्वीच नकार दिल्याने आता जयंत पाटलांना कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. (Leaders of other parties contact to me; Will be joining NCP soon : jayant patil)

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज (ता. १९ एप्रिल) सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात होती. त्यावेळी मतदारसंघाच्या आढावा बैठकीत जयंत पाटील बोलत होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनीच आपण भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. आपण आहे तिथेच खूष आहोत, असे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे जयंतरावांनी आता कोणावर गळ टाकला आहे, अश चर्चा तालुक्यात रंगली आहे.

या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रभरात आपला पक्ष वाढवण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. जत तालुक्यात आपल्या राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या भागात राष्ट्रवादीचा विस्तार होण्यास आता मोठी मदत होईल. बुथ कमिट्यांवर भर द्या, बूथ कार्यकर्त्यांनी लोकांच्या मदतीला धावून जावं, हे केल्याने आपण लोकांच्या मनात घर करू. बुथ कमिट्या लवकर केल्या, तर ते चांगले होईल.

जत तालुक्यातील पाण्याची समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे. तालुक्यातील ६५ गावांसाठीच्या पाणी योजनेच्या कामाला गती देण्यात येईल, त्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल. आगामी काळात मी पुन्हा जत तालुक्यात येईन, तेव्हा आपण पुन्हा एकदा आढावा घेऊ. विविध प्रश्नांचा ऊहापोह करण्याचे काम केले जाईल व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी पुन्हा आश्वासित केले.

यावेळी महिला आयोगाच्या राज्याच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, प्रतीक पाटील, बसवराज पाटील, सुरेश शिंदे, जत तालुकाध्यक्ष रमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT